शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंची विजेतेपदावर मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 15:17 IST

पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपट्टनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. 

 कल्याण- पॅरालिंपिक राज्य संघटनाच्या मान्यतेने पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन ठाणे व श्री तिसाई प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 12 व्या राज्यस्तरीय दिव्यांग जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या जलतरणपटूंनी आपली चमकदार कामगिरी करीत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.     ठाणो जिल्हयात प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आली. कल्याण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आधारवाडी येथे ही स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेसाठी नाशिक, पुणो, औरंगाबाद, सातारा,कोल्हापूर, ठाणो, मुंबई, सोलापूर, बीड अशा 18 जिल्ह्यातून 128 स्पर्धक आले होते. ही स्पर्धा अंध व अस्थिव्यंग मुले व मुली अश्या दोन्ही गटात पार पडली. स्पर्धेसाठी ज्युनियर, सब ज्युनियर, सिनियर असे तीन गट केले होते. फी स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, आयएम अश्या पाच प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेचा जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडूंना फायदा होणार आहे. सामान्य खेळाडूप्रमाणोच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यांचे आयोजन केले असल्याचे तिसाई संस्थेचे अध्यक्ष व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले.     या स्पर्धेत पुणो संघानी उपविजेतेपद पटकाविले आहे. यजमान ठाणोला तृतीय क्रमांकावर समाधान मानवे लागले. या स्पर्धेत 162 खेळाडूंनी सुवर्णपदक, 79 रौप्य आणि 31 जणांनी कांस्यपदक पटकाविले आहे. आर्यन जोशी याने 6 सुवर्णपदक, सिध्दार्थ सावंत याने 4 रौप्यपदक, गोरख शिंदे याने 4 सुवर्ण, प्रथमेश कापडे याने 5 सुवर्ण, वैष्णवी जगताप 5 सुवर्ण, कांचनमाला पांडे याने 4 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.    या स्पर्धेला अभिमन्यू गायकवाड, हेमलता पावसे, विस्तारक दिनेश अग्रवाल, भाजपा पूर्व अध्यक्ष संदीप सिंग, ठाणे जिल्हा पॅरा संघटनेचे सचिव अर्चना जोशी, भाजपा कार्यकर्ते संतोष पाटील, अरूण दिघे, संदीप तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडाthaneठाणे