तलासरी : तलासरी तालुक्यातील मौजे कोदाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या आठ दिवसापासून कार्यालयात येतच नसल्याने गावकऱ्यांना दाखल्यासाठी दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. तर ग्रामसेवक येत नसल्याने बँकेत खाते उघडणे तसेच पेसाची कामेही रखडल्याची माहिती ग्रामसेवक निर्मला पवार यांनी माहिती दिली.ग्रामसेवक रमण जनाथे हे गेल्या आठ दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकले नसल्याने गावकरी हैराण झाले आहेत यावेळी गावकऱ्यांनी सरपंच निर्मला पवार यांना हटकले असता सरपंचानी त्यांना मोबाईलवर फोन लावला असता त्याचाही फोन त्यांनी उचलला नाही.पेसाची कामे करण्यासाठी बँकेत संयुक्त खाते उघडावयाचे आहे परंतु ग्रामसेवक येत नसल्याने खाते उघडता येत नाही. ग्रामपंचायतीची ग्रामसभा लावणे बाकी आहे. परंतु ग्रामसेवकाविना कामे रखडली आहेत. याबाबत निर्मला पवार यांनी गटविकास अधिकारी तलासरी यांच्याकडे तक्रार करूनही परिस्थिती जैसे थे असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
कोदाडचे ग्रामसेवक आठ दिवस नॉट रिचेबल?
By admin | Updated: March 2, 2016 01:36 IST