शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात को.म.सा.प. चा ‘आम्ही पण वाचतो’ उपक्रमातून वाचकांची अभिरुची वाढविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:13 IST

ठाणेकरांसाठी विविध कार्यक्रम राबविणाऱ्या कोमसाप ठाणे शाखेच्या वतीने वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

ठळक मुद्दे‘आम्ही पण वाचतो’ हा अभिनव उपक्रमप्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम कुठल्याही एका साहित्य प्रकारावर आधारीत पुस्तकावर बोलण्याची संधी

ठाणे: वाचन संस्कृती टिकविण्यासाठी आणि वाचकाचे पुस्तकाशी असलेले नाते जाणून घेण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शहर आयोजित ‘आम्ही पण वाचतो’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.      अशा प्रकारचा उपक्रम कोमसाप पहिल्यांदाच राबवित आहे. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. वाचनाची पिढी कमी होत आहे अशी ओरड केली जाते. परंतू वाचन हे केले जात असले तरी तो टक्का तेवढा वाढलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा उपक्रम हाती घेण्याचे कोमसापने ठरविले आहे. यात वाचक वाचलेल्या पुस्तकांवर आपले अनुभव कथन करणार आहेत, त्यातील एखादे प्रसंग सांगतील असे कोमसाप, ठाणेतर्फे सांगण्यात आले. या उपक्रमात सहभागी होणारे मान्यवर देखील वाचनाचे फायदे सांगणार आहेत, एखादे पुस्तक वाचल्यावर काय फरक पडतो हे उपस्थितांना सांगतील. हा उपक्रम गुरूवार २१ डिसेंबर रोजी सायं. ५ ते ७ यावेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे (प.) येथे राबविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. अनंत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी, ज्येष्ठ व्यगंचित्रकार - लेखक विवेक मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.       सर्व वाचनालयातील सभासद, पदाधिकारी, विविध ग्रंथप्रेमी संस्थांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे शहर अध्यक्षा मेघना साने यांनी केले आहे. वाचकांना पाच मिनीटाच्या कालावधीत कथा, कादंबरी, चरित्र यापैकी कुठल्याही एका साहित्य प्रकारावर आधारीत पुस्तकावर बोलण्याची संधी दिली जाणार आहे. कार्यक्रम विनाशुल्क आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य