शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

ठाण्याच्या किंगकाँगनगरमध्ये चाकूच्या धाकावर त्रिकुटाने घरात शिरुन केली लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 23:59 IST

किंगकाँगनगरमधील एका घरात शिरुन तिघा जणांच्या टोळक्याने चाकूच्या धाकावर २५ वर्षीय महिलेकडील दागिने आणि मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. भल्या पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारनाटयामुळे एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देसोन्याच्या दागिन्यांसह ५३ हजारांच्या ऐवज लुबाडलापहाटेच्या सुमारास थरारनाटय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या किंगकाँगनगरमधील एका घरात शिरुन तिघा जणांच्या टोळक्याने चाकूच्या धाकावर २५ वर्षीय महिलेकडील दागिने आणि मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घोडबंदर रोडवरील किंगकाँगनगरमधील साईबाबा मंदिराच्या मागे असलेल्या एका घरात २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास २० ते २५ वयोगटातील टोळके शिरले. दरवाजाला धक्का मारुन कडी तोडून त्यांनी आत शिरकाव केला. त्यावेळी तिघांपैकी एकाने घरातील २५ वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर दमदाटी करीत त्यांचे २० हजारांचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १२ हजारांची तीन ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि प्रत्येकी दहा हजारांचे दोन आणि एक हजारांचा एक मोबाइल असा ५३ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.* एक आठवडयापूर्वीच एका सराफाला कोयत्याच्या धाकावर चार जणांच्या टोळीने दिवसाढवळया लुटले होते. पोलिसांनी या चौघांपैकी दोघांना अटक केली असून त्यांचे दोन्ही साथीदार मात्र अद्यापही फरार आहेत. या भागात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी