शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाची हत्या, भार्इंदरमधील घटना : पवई पोलिसांकडून दोघांना अटक, सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:33 IST

मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली.

मीरा रोड : मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पवई पोलिसांनी दोघांना मंगळवारी अटक केली आहे.पवईतील बबलू सिंग यांचा १० वर्षांचा मुलगा रितेश रविवारी दुपारपासून बेपत्ता होता. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. बबलू यांचा चुलत भाऊ संतोष सिंगसोबत काम करणारा अमर सिंग (२०) याने त्याला खेळण्यासाठी म्हणून नेले. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. अमरने मात्र मुलाला घराजवळच सोडले, असा कांगावा केला होता.दरम्यान, पोलिसांना अंधेरी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये रितेशला घेऊन जाताना अमर व त्याचा साथीदार लालू ननकू सिंग (२१) दिसले. त्यानंतर अमरला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लालूला सामील होऊन रितेशची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांना अटक करीत मंंगळवारी पहाटे पवई पोलिसांच्या पथकाने मैदानात टाकलेला रितेशचा मृतदेह ताब्यात घेतला.फोनमुळे घाबरल्याने रितेशला संपवले-बबलू सिंग यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, मात्र त्यांच्या घरी रोज जाणे-येणे असलेल्या अमर सिंग याने बबलू यांना एकदा पैसे मोजताना पाहिले होते. त्यामुळे बबलू यांच्याकडे भरपूर पैसे आहेत या समजातून त्यांच्या मुलाचे अपहरण त्याने केले. मात्र मुलगा हरवल्यानंतर माझा मुलगा कुठे आहे, हे विचारण्यासाठी बबलू यांनी अमर याला फोन केल्याने घाबरलेल्या अमरने रितेश याची हत्या केली.ज्या मैदानात हत्या केली ते पालिकेच्या मालकीचे असून येथे भंगाराची गोदामे, झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे मद्यपी, गर्दुल्ल्यांचा राबता असतो. एक वर्षापूर्वी ६ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून येथे तिची हत्या केली होती.

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणMumbaiमुंबई