शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याने वार करुन खूनी हल्ला करणाऱ्यास दिड वर्षांनी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे ) या तरुणांवर आपल्या चार ...

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईचौघांना झाली होती यापूर्वीच अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: टोळी युद्धातून सुमित सकपाळ (२४, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या तरुणांवर आपल्या चार साथीदारांच्या मदतीने कोयत्याने खूनी हल्ला करुन गेल्या दिड वर्षांपासून पसार झालेल्या अरबाज उर्फ बाबू खवºया मकबूल खान याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्याला आता कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.घोडबंदर रोड येथे राहणारा सुमित हा आपल्या मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करुन ६ एप्रिल २०१९ रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास घराकडे येत होता. त्यावेळी तो हिरानंदानी इस्टेट येथील ‘द वॉक’ या इमारतीच्या शेजारी उभा असताना मोटारसायकलवरु न आलेल्या एका टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर पाच जणांच्या टोळक्यापैकी तिघांनी सकपाळ यांना पकडले. तर चौथ्याने त्याच्या डाव्या पायाजवळ कोयत्याने हल्ला केला होता. यात सकपाळ याच्या उजव्या कानाजवळ, डाव्या डोळयाच्या वर आणि कपाळावरही गंभीर जखमी केले. या झटापटीत त्याची सोनसाखळीही गहाळ झाली होती. हल्ल्यानंतर हे टोळके तिथून पसार झाले होते. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यात चौघांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा पाचवा साथीदार अरबाज हा पसार झाला होता. कासारवडवली पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट एकचे पथक गेल्या दिड वर्षांपासून त्याच्या मागावर होते. दरम्यान, अरबाज ठाण्यातील धर्मवीर नगर येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ६ आॅक्टोबर रोजी अरबाजला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला कासारवडवली पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून