शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चालत नसल्यामुळे ठाण्यात मालकिणीने केले आचाऱ्याचे अपहरण: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 21:04 IST

हॉटेल तोटयात जात असल्यामुळे कासारवडवलीतील ‘सखी किचन’च्या हॉटेल मालकिणीने चक्क पूर्वाश्रमीच्या आचा-याचेच अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

ठळक मुद्देसोडून गेलेल्या आचा-याला मालकीणीची दमबाजीपुन्हा कामावर येण्यासाठी केले अपहरणपत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केली सुटका

ठाणे : आचारी सोडून गेल्यानंतर हॉटेल चालत नसल्यामुळे संजू राणा (२२, रा. किंगकाँगनगर, ठाणे) या आचा-याचे अपहरण करणा-या अश्विनी हाडके या हॉटेलमालकिणीविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कृष्णकुमार पटेल (१९) आणि दीपू आदिवासी (२२, रा. दोघेही किंगकाँगनगर, ठाणे) या तिच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अपहृत आचा-याची अवघ्या २४ तासांत सुटका केली आहे.ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट येथे असलेल्या ‘सखी किचन’ या अश्विनी यांच्या हॉटेलमध्ये संजू हा गेल्या दीड वर्षापासून आचारी म्हणून नोकरीला होता. त्यापोटी त्याला १५ हजार रुपये पगार दिला जायचा. त्याच्यासह त्याची पत्नी लक्ष्मी आणि मेहुणी पार्वती या दोघीही तिथे नोकरीला होत्या. काही कारणास्तव जेवणाची आॅर्डर रद्द झाली किंवा ते उशिरा कामावर आले की, संजूसह या तिघांचाही हॉटेलमालकीण अश्विनी पगारकपात करून दरमहिन्याला अवघा दोन ते तीन हजार रुपये पगार द्यायची. या सर्वच प्रकाराला कंटाळून संजूसह तिघांनीही १५ दिवसांपूर्वी तिच्याकडील काम सोडले. त्यानंतर, भूमी एकर येथील आर.बी. किचन यांच्या हॉटेलमध्ये तो आचारी म्हणून गेल्या १४ दिवसांपासून नोकरीला लागला. संजू यांनी काम सोडल्यानंतर हॉटेलवर परिणाम झाल्यामुळे अश्विनी यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला. याच रागातून ४ मे २०१८ रोजी रात्री ९ वाजता आर.बी. किचनमध्ये असलेल्या संजूला अश्विनी हिने दमदाटी केली. कृष्णकुमार आणि दीपू या दोन मुलांच्या मदतीने तिने संजूला एका रिक्षामध्ये कोंबून त्याचे अपहरण केले. ‘तू हॉटेल सोडून गेल्यापासून माझे हॉटेल बंद झाले. तू माझ्या हॉटेलमध्ये काम केले नाही, तर मी तुला एखाद्या केसमध्ये फसवून टाकेल’, अशी धमकीही देऊन त्याला ब्रह्मांड भागात सोडले. त्यानंतर, पुन्हा आर.बी. किचनमधून त्याचे अश्विनीसह तिघांनी अपहरण करून रिक्षातून नेले. याप्रकरणी संजूची पत्नी लक्ष्मी हिने कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीचे अश्विनीसह तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल केली.ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी आणि उपनिरीक्षक एम.के. पोटे यांच्या पथकाने ५ मे रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास संजूची सुटका केली. लक्ष्मीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अश्विनीकडे संजूची चौकशी केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. संजू त्याचा गाववाला शंकर याच्याकडे गेल्याची माहिती देऊन पोलिसांची तिने दिशाभूल केली. नंतर, डोंगरीपाडा भागातून कृष्णकुमार आणि दीपू यांच्या ताब्यातून पोलिसांनी संजूची सुखरूप सुटका केली. यातील मुख्य सूत्रधार अश्विनीलाही लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाKidnappingअपहरण