शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून आणखी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 05:35 IST

ठाण्यातून आणखी एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

ठाणे : ठाण्यातून आणखी एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी शनिवारी अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिनाभरातील ही चौथी घटना असल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.घोडबंदर रोडवरील विजयनगरी भागात राहणारी उर्वशी सिंग ही मुलगी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. नातेवाइकांकडे तसेच परिसरात शोध घेऊनही ती न मिळाल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करून तिचे वडील राजू सिंग यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात २९ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली.मुलीचा रंग सावळा, सडपातळ बांधा, उंची पाच फूट, काळे डोळे, उभट चेहरा, सरळ नाक, लांब काळे केस असून, तिने काळ्या रंगाचा टॉप आणि जीन्स पॅण्ट परिधान केलेली आहे. तिच्याबाबत माहिती असल्यास कासारवडवली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.>अन्य दोघींचा शोध सुरूचयाआधी वागळे इस्टेट, विटावा आणि इंदिरानगर भागातूनही तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना घडल्या. वागळे इस्टेट येथील एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने कर्जत (जि. रायगड) येथून १५ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुटकाही केली. उर्वरित दोन मुलींचा अद्यापही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.