शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

४ तासांच्या बाळाचे अपहरण, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना, मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:04 IST

अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी पहाटे घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

ठाणे : अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झाल्याचा प्रकार रविवारी पहाटे घडला. बाळाची आई मोहिनी मोहन भोवर (१९, रा. भिवंडी) हिने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरुद्ध मनसेने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बाळाचे अपहरण करणाºया या महिलेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिवंडीच्या आदिवासी पाड्यात वास्तव्यास असलेल्या मोहिनी यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्या वेळी तेथील रुग्णालय प्रशासनाने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले होते. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले. तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक प्रसूतीने मुलाला जन्म दिला. रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून, एका अनोळखी महिलेने तिच्याकडून हे बाळ नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले. तिची आई आणि पती हे चहा पिण्यासाठी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान बाहेर पडले. त्याच वेळी हा प्रकार घडला. काही वेळाने प्रसूती कक्षातील परिचारिका तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली. तेव्हा बाळाला आईकडे बाहेर पाठविल्याचे तिने सांगितले. आपण बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठविले नसल्याचे तिने सांगितल्यानंतर, तत्काळ पोलिसांना आणि संबंधित डॉक्टरांना याबाबतची माहिती परिचारिकांनी दिली. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून, चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयीन सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणीबाळ चोरीला गेल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्यामुळे अज्ञात व्यक्तीऐवजी थेट जिल्हा शल्यचिकित्सकांवरच गुन्हा दाखल करावा, तातडीने सुरक्षारक्षक नेमावेत आदी मागण्यांसाठी मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष रवींद्र मोरे, उपशहराध्यक्ष विश्वजित जाधव, पुष्कर विचारे, जावेद शेख, तसेच महेश कदम आणि आशिष डोके आदींनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाबाहेर रविवारी सकाळी ठिय्या आंदोलन करून, या घटनेचा निषेध नोंदविला. या कारभारात सुधारणा झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही मनसेने दिला आहे.