शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे व सांडपाणी; म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 18:30 IST

कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे.

कल्याण- कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महार्गावर म्हारळ पाडा व म्हारळ गावानजीक खड्डे पडले असून त्याठिकाणी महामार्गाच्या रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहणारी गटारे तुडुंब भरल्याने सांडपाणी महामार्गावरुन वाहत आहे. त्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करीत वाट काढावी लागते. या सांडपाण्याकडे म्हारळ ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे. तसेच सार्वजनीक बांधकाम खात्याकडे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कल्याण अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग 222 आहे. हा रस्ता शहरी भागात अरुंद स्वरुपाचा आहे. सेंच्युरी रेयॉनचे गेट सोडले की पुढे तो प्रशस्त आहे. या रस्त्यावर म्हारळ हे गाव आहे. म्हारळ गावात जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे तीन गण आहेत. नुकतीच पंचातय समितीची व जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यात सोयी सुविधा पुरविण्याची आश्वासने देण्यात आली. मात्र निवडणूक संपून निकाल लागला तरी सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हारळ ग्रामपंचायतीला लागूनच उल्हासनगर व कल्याण शहर असल्याने या ठिकाणी म्हारळ ग्रामपंयात हद्दीत नागरीकरण होत आहे. या नागरीकरणामुळे म्हारळ ग्रामपंचायत आर्थिक दृष्टय़ा सक्षम आहे. वर्षाला एक कोटी रुपये ग्रामपंचातीला उत्पन्न मिळते. चांगला महसूल जमा होतो. महसूल जमा होऊन देखील महामार्गानजीक असलेली गटारे स्वच्छ केली जात नाही. सगळे सांडपाणी महामार्गावरून वाहत आहे. पावसाळ्य़ाती जलसदृश्य परिस्थिती व्हावी अशी स्थिती त्याठिकाणी पाहावयास मिलते. दुसरीकडे याच रस्त्यावर म्हारळपाडा येथे रस्ता इतका खराब झाला आहे की त्यावर खड्डे पडले आहेत. हा महामार्ग आहे की, ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एखाद्या पाडय़ावर जाणारा मार्ग आहे अशी स्थिती आहे. सार्वजनीक बांधकाम खात्याकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे अक्षम्य डोळे झाक केली जात आहे. महामार्गावरुन जाणारी चार चाकी व दुकाकी वाहने खड्डय़ातूनच वाट काढीत वाहने हाकत आहेत. रात्रीच्या वेळी तर नगरहून माल घेऊन येणा-या मालवाहू वाहनांना खडडय़ामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या महामार्गाचे चौपदीरकरण होणार आहे. हे चौपदरीकरण प्रस्तावित आहे. त्याच्या कामसाठी हा मार्ग दहा दिवस बंद ठेवण्यात येणार होता. मात्र निवडणूकीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी चौपदरी करणाच्या कामाचे प्राथमिक काम पुढे ढकलण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याण