शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

खारीगाव आरओबी जानेवारीपर्यंत खुला होणार,  खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली कामाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:21 IST

खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ठाणे - कळवा आणि मुंब्रा दरम्यान ठाणे महापालिका आणि रेल्वे संयुक्तरित्या करत असलेल्या खारीगाव आरओबीचे काम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होऊन तो सेवेत दाखल होईल. त्यामुळे खारीगाव येथील रेल्वे फाटक बंद होऊन उपनगरी सेवेच्या किमान ५० फेऱ्या वाढवून प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा देणे शक्य होईल, असा विश्वास कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.खारीगाव येथील रेल्वे फाटकामुळे येथे अनेकदा लोकल थांबवाव्या लागतात. तसेच, कमी वेगात लोकल चालवाव्या लागतात. याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून गाड्या विलंबाने धावणे, तसेच लोकलच्या फेऱ्या वाढवता न येणे आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे खारीगाव येथील हे फाटक बंद करून या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, प्रत्यक्ष कामाला वेग येत नव्हता. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या प्रकल्पासमोरील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. उड्डाणपुलाच्या खारीगाव येथील बाजूस असलेल्या मैदानाचे या उड्डाणपुलामुळे दोन भागात विभाजन होत असल्यामुळे तेथील नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. तसेच, पलिकडील बाजूस मफतलाल कंपनीची जमीन असल्यामुळे तेथेही उड्डाणपुल उतरवण्यासंदर्भात अडचणी होत्या. त्यामुळे रेल्वेने त्यांच्या हद्दीतील कामाला सुरुवात केली तरी, ठाणे महापालिकेच्या वाट्याच्या कामाला म्हणावी तशी गती येत नव्हती.त्यामुळे खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासन, ठाणे महापालिका आणि स्थानिकांच्या वारंवार बैठका घेतल्या. उड्डाणपुलाच्या खारीगाव बाजूकडील आरेखनात बदल करून मैदान वाचवले. त्यामुळे स्थानिकांचा विरोध मावळला. तसेच, पलिकडील बाजूस लागणाऱ्या जमिनीसाठी ठाणे महापालिकेने ४० कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे तेथील प्रश्नही निकाली निघाला. सर्व अडचणी दूर झाल्यामुळे कामाला वेगाने सुरुवात झाली होती. परंतु, अचानक उद्भवलेल्या कोव्हिडच्या संकटामुळे पुन्हा कामाला खीळ बसली. कोव्हिडचे संकट आले नसते तर आतापर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल सेवेत दाखल झाला असता.मात्र, आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असून खा. डॉ. शिंदे यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. पुलाचे ७३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पूर्ण होऊन जानेवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. याप्रसंगी ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता पाफळकर, अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे