शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
4
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
5
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
6
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
7
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
8
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
9
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
10
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
11
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
12
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
13
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
14
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
15
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
16
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
17
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
18
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
19
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
20
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या

‘खेमानी’वरून स्थायी समितीत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:22 IST

महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत खेमानी नाल्याच्या वाढीव कामावरून आयुक्त विरोधात सभापती, सदस्य असा सामना रंगला.

उल्हासनगर : महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत खेमानी नाल्याच्या वाढीव कामावरून आयुक्त विरोधात सभापती, सदस्य असा सामना रंगला. स्थायी समितीच्या मंजुरीविना प्रस्तावाला मंजुरी दिलीच कशी? असा प्रश्न समिती सदस्यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत आयुक्तांना विचारला.उल्हासनगर महापालिकेसह राज्य सरकारवर खेमानी नाल्याच्या कामावरून टांगती तलवार लटकली आहे. ६ आॅक्टोबरला राज्य सरकारला नाल्याच्या प्रगतीचे प्रतिज्ञापत्र सर्वाेच्च न्यायालयात पालिकेच्या वतीने सादर करावे लागणार असून नाल्याच्या कामावरून पालिका आणि सरकार तोंडघशी पडणार असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाल्याचे काम ३० टक्केही झाले नसून नाल्यावर बंधारा, मलनिस:रण केंद्र, पम्पिंग स्टेशन यांचा पत्ताच नाही. फक्त विहीरीचे काम सुरू असून जलवाहिन्यांचे काम अर्धे झाल्याची माहिती पत्रकार परिषेदत आयुक्तांनी दिली होती.उल्हासनगरमधून वाहणाºया नाल्यातील सांडपाणी थेट उल्हास नदीत जात असल्याने ती प्रदूषित झाली आहे. नदीच्या प्रदूषणाबाबत वनशक्ती संस्थेने जनहित याचिका दाखल केल्यावर हरित लवादाने उल्हासनगर पालिकेसह संबंधित पालिका, एमआयडीसी, प्रदूषण मंडळावर १०० कोटीचा दंड ठोठावला आहे.पालिका न्यायालयात गेल्यावर दंडाला तात्पुरती स्थगिती मिळाली असली तरी, पूर्णत: धोका टळलेला नाही. राज्य सरकारने उल्हास नदी प्रदूषित करणाºया खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्यासाठी पालिकेला ३२ कोटीचा निधी दिला आहे.महापालिकेने खेमानी नाल्याचा प्रवाह वळवण्याचे कंत्राट जयभारत व खिल्लारी कंपनीला फेब्रु्रवारी २०१६ मध्ये दिले. १५ महिन्यात नाल्याचे काम करण्याची मुदत होती.मात्र कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने, नाल्याचे काम अर्धवट राहिले. महापालिकेच्या नोटीसनंतर कंत्राटदाराने १२ महिन्याची मुदत वाढवून मागितली. तसेच ४ कोटी २० लाखाच्या वाढीव कामाचा प्रस्ताव पालिकेपुढे ठेवला. आयुक्तांनी वाढीव कामाचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला. स्थायी समिती सभापती कंचन लुंड यांनी प्रस्तावा बाबत आयुक्तांसह संबंधित विभागाकडून माहिती मागवली.स्थायी समितीला प्रस्ताव पाठवून ४५ दिवस झाले असे कारण आयुक्तांनी पुढे करून समितीच्या मंजुरीविना सव्वाचार कोटीच्या वाढीव कामाला परस्पर मंजुरी दिली. याप्रकाराने सभापतींसह इतर सदस्यांनी आक्षेप घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आयुक्त राजेंद्र निंबाळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडले आहे.

टॅग्स :thaneठाणे