शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

खंबाळपाडा परिसरात उग्र दर्पाने रहिवासी त्रस्त, वायुप्रदूषणाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:56 IST

औद्योगिक विभागातील फेज-१ पट्ट्यात आठ दिवसांपासून वायुप्रदूषणाचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे.

डोंबिवली : औद्योगिक विभागातील फेज-१ पट्ट्यात आठ दिवसांपासून वायुप्रदूषणाचा नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. दोन दिवस दर्पाची तीव्रता अधिक वाढल्याने खंबाळपाडा परिसरात मळमळणे आणि उलट्यांचा त्रास स्थानिक रहिवाशांना सुरू झाला आहे. याबाबत सोमवारी रहिवासी एमआयडीसी आणि प्रदूषण कार्यालयात धाव घेणार आहेत.औद्योगिक परिसरात अनेक रासायनिक कंपन्या असून त्यातून अधूनमधून तीव्र स्वरूपाचे वायुप्रदूषण होत असते. यात उघडे नाले आणि गटारांमधून कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी सोडण्यात येत असल्याने याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसतो. सध्या खंबाळपाडा भागात या प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे. रात्री हा दर्प ठाकुर्ली परिसरातील ९० फूट रोड परिसरापर्यंत पसरलेला असतो. या प्रदूषणाकडे गांभीर्याने का पाहत नाही, असा सवाल रहिवाशांचा आहे. खंबाळपाडा, भोईरवाडी परिसरात राहणारे काळू कोमास्कर यांनी अनेक दिवसांपासून हा त्रास सुरू असल्याचे सांगितले.>प्रदूषण मंडळाच्या कार्यालयाला भेट देणाररात्री उशिरा येथील रासायनिक कंपन्या प्रचंड दुर्गंधीयुक्त जल व वायुप्रदूषण करत आहेत. फेज-१ मध्ये केमिकल झोन नसतानाही याठिकाणी केमिकल कंपन्या बेकायदेशीरपणे उभारल्या आहेत, याकडे कोमास्करांनी लक्ष वेधले आहे. शनिवार आणि रविवार एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण कार्यालयाला सुटी असल्याने सोमवारी आम्ही स्थानिक नागरिक संबंधित कार्यालयांना भेट देऊन अधिकाऱ्यांचे प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती कोमास्कर यांनी दिली.