शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ठामपा तिजोरीत खडखडाट,  जनता तुमचा हिशोब लावणार; केदार दिघे आक्रमक 

By अजित मांडके | Updated: March 5, 2024 15:18 IST

प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे :  ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असून पालिका कर्मचाºयांचे पगार देण्यासाठी महापालिकेने इतर निधी वर्ग केल्याची बाब समोर आली आहे. याच मुद्यावरुन आता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी पालिका प्रशासनावर बोचरी टिका केली आहे. तिजोरीत खडखडात असतांना देखील इतर गोष्टींवर वारेमाप खर्च सुरु असून ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर गोष्टींवर वारेमाप खर्च सुरू आहे. ठाणे महापालिकेत फक्त ठेकेदारांचे खिसे भरले जात नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आर्थिक वर्ष संपत आले असतांना पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले आहे. महापालिकेत अधिकारी, कर्मचाºयांचा पगार देण्यासाठी देखील निधी शिल्लक नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महुसली कामांना ब्रेक लावून तो निधी कर्मचाºयांचा पगार देण्यासाठी वर्ग करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे दैनंदिन कामांना त्याचा फटका बसणार आहे. याशिवाय ठेकेदारांची बिले देण्यासाठी देखील पालिकेकडे सध्या निधी नाही. छोट्या ठेकेदारांची बिले थांबविली जात असून मोठ्या ठेकेदारांची बिले केवळ एका फोनवर काढली जात असल्याचेही माहिती देखील पुढे आली आहे. त्यामुळे यासाठी निधी येतो कुठुन असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता याच मुद्यावरुन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.

प्रशासन चालवत असताना आर्थिक नियोजनावर लक्ष देता की दुसऱ्यांच्या तिजोरी भरल्यामुळे पालिकेत खडखडाट आहे असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे. हे पैशाचं पाणी नेमकं कुठं मुरतंय.. हे पब्लिक सब जानती हैं. घोडे मैदान लांब नाही जनता तुमचा हिशोब लावणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर ठाणे येथे अतिक्रमण विभागाच्या कारवाई वेळी एका ६५ वर्षीय सर्वसामान्य व्यक्तीचा जीव गेला याला जबाबदार कोण? अनधिकृत बांधकामे सुरू असताना प्रशासन आणि अधिकारी झोपलेले असतात का की लाचेमुळे दुर्लक्ष करतात हे त्यांनी स्पष्ट करावे किंवा आयुक्तांनी राजीनामा द्यावा किंवा अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका