शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

समांतर रस्त्यावरून धावणार केडीएमटी

By admin | Updated: July 7, 2017 06:14 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर बसअभावी बंद केलेले डोंबिवलीतील मार्ग तातडीने चालू करा, असे आदेशही सभापती संजय पावशे यांनी प्रशासनाला दिले.ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावरून परिवहनची बससेवा सुरू करण्यासंदर्भात शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी प्रस्ताव सूचना समितीच्या बैठकीत दाखल केली होती. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान कल्याण रेल्वेस्थानक, बैलबाजार, पत्रीपूल, मोहन सृष्टी संकुल, कचोरे गाव, खंबाळपाडा, म्हसोबा चौक, घरडा सर्कल ते डोंबिवली रेल्वे स्थानक या मार्गावर बस सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा रस्ता म्हणून नागरिक समांतर रस्त्याचा वापर करत आहेत. या रस्त्यालगत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे येथील रहिवासी या रस्त्यावरून बससेवा सुरू करण्याची मागणी करत होते. त्याची दखल घेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी सूचनाही या वेळी सदस्यांनी केली.केडीएमटीतील आयुर्मान संपलेली एक मोठी बस आणि १ मिडी बस टोर्इंग व्हॅनमध्ये परावर्तीत करावी, अशी पावशे यांची प्रस्ताव सूचनाही या वेळी मान्य करण्यात आली. केडीएमटीतील बसचे आयुर्मान साधारण १० वर्षे आहे. ते संपलेल्या बस साधारणपणे नादुरुस्त असतात. केडीएमटीच्या ताफ्यातील अशा नादुरुस्त बसचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे त्यांचा टोर्इंगसाठी वापर करणे कितपत योग्य, अशीही चर्चा आहे. यासंदर्भात उपक्रमाचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रस्ताव हा अशासकीय होता. परंतु, आयुर्मान संपलेल्या, परंतु भंगारात न काढलेल्या अशा बसचा टोर्इंगसाठी वापर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुन्हा बैठकीत ठेवला जाईल, असे सांगितले. परिवहन समितीत मंजूर केल्या जाणाऱ्या ठरावांची ठोस अंमलबजावणी होत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. यासंदर्भात पावशे यांना विचारले असता ते म्हणाले, की येत्या १५ दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होईल. रेल्वे समांतर रस्ता तसेच बंद असलेल्या मार्गांवर येत्या काही दिवसांत एकतरी बस चालवण्यात येईल. लाचखोरीच्या प्रकरणात अटक झालेले अधीक्षक राजन ननावरे यांच्यावर न्यायालयात खटला (अभियोग) दाखल करण्यास समितीने मान्यता दिली. ननावरे यांना २७ डिसेंबर २०१६ ला एका कंत्राटी वाहकाकडून सात हजारांची लाच घेताना अटक झाली होती. दरम्यान, पुढील न्यायालयीन कारवाई करण्यासाठी गुरुवारी सक्षम प्राधिकरण असलेल्या परिवहन समितीची मान्यता घेण्यात आली. बंद केलेले मार्ग तातडीने चालू कराबसअभावी बंद केलेले डोंबिवलीतील मार्ग तातडीने चालू करणे व सर्व मार्गांवरील बस फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबतचा प्रस्ताव मनसेचे सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी मांडला होता. त्यालाही मान्यता देण्यात आली. पी अ‍ॅन्ड टी कॉलनी, गोग्रासवाडी, खंबाळपाडा, नांदिवली, भोपर, नवनीत नगर, लोढा हेवन, महाराष्ट्रनगर, रेतीबंदर, गरीबाचा वाडा या मार्गावर केडीएमटीची बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे उपक्रमात नव्याने दाखल झालेल्या बस या मार्गांवर चालवण्यात याव्यात, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात सायंकाळी रिक्षा अपुऱ्या पडल्यामुळे तसेच रिक्षावाल्यांच्या मनमानी कारभार व परिवहनच्या बसअभावी २९ जूनला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. यात प्रवाशांमध्ये मोठा उद्रेक होऊन आंदोलन झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बंद केलेल्या मार्गावर पुन्हा केडीएमटी सुरू करावी, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले. याला पावशे व अन्य सदस्यांनी मान्यता दिली.