शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी कर्मचाºयांचे ‘कामबंद’ दोन तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:45 IST

केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांपैकी एक महिन्याचे वेतन तातडीने दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

कल्याण  - केडीएमटीच्या कर्मचाºयांचे वेतन दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियन या संघटनेने सोमवारी गणेशघाट बस डेपोजवळ दोन तास कामबंद आंदोलन केले. त्यानंतर, संघटनेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी थकीत दोन महिन्यांपैकी एक महिन्याचे वेतन तातडीने दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. त्यामुळे दुपारनंतर कामबंद आंदोलन मागे घेतल्याचे संघटनेने सांगितले.परिवहनच्या कर्मचाºयांचे पगार दोन महिन्यांपासून थकल्याने परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी सोमवारपासून चक्काजामचा इशारा दिला होता. पश्चिमेतील गणेशघाट बस डेपोजवळ युनियनने प्रवेशद्वार सभा घेतली. या वेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी चक्काजाम आंदोलन दुपारी १२ वाजता सुरू करण्याचे आवाहन केले. त्यानुसार, त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. त्यास धडक युनियनचे अभिजित राणे यांनी जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनाच्या ठिकाणी राणे यांनी भेट दिली. राणे व मोरे यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी कर्मचाºयांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी एक महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची व्यवस्था करतो. आणखी एका महिन्याचे थकीत वेतन १५ मार्चपर्यंत देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासनही दिले. याशिवाय, महापौर व स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमार्फत परिवहनच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. समितीच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असे सांगण्यात आले.केडीएमटीतून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे महापालिकेकडे अनुदानाची मागणी करावी लगते. आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी परिवहन सक्षम नाही. त्यामुळे त्याचे खाजगीकरण करण्याची भाषा स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी केली होती. याविषयी मोेरे म्हणाले, परिवहनच्या कामगारांना आधी महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करावे. त्यानंतर, प्रशासनाने परिवहनचे खाजगीकरण करावे. परिवहन उपक्रमाची मान्यताप्राप्त संघटना कर्मचाºयांच्या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करत नाही. मान्यताप्राप्त संघटनेने १ मार्चला परिवहन सभापतींच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु, पगार देण्याचे अधिकार सभापतींना नाहीत. त्यामुळे या आंदोलनातून काय साध्य झाले, असा सवाल मोरे यांनी केला. मान्यताप्राप्त संघटनेचे आंदोलन म्हणजे दिखावा होता. त्यातून प्रश्न काही सुटला नाही, अशी टीका केली.केडीएमटीचे सभापतीपद भाजपाकडे ; सुभाष म्हस्के बिनविरोध : आज होणार शिक्कामोर्तबकल्याण : केडीएमसीच्या परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक मंगळवारी होत आहे. त्यासाठी सोमवारी भाजपाचे सदस्य सुभाष म्हस्के यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजता निवडणुकीच्या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणारे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करतील. परिवहन समितीमध्ये एकूण १३ सदस्य आहेत. 'त्यात शिवसेना ५, भाजपा ६, मनसे आणि काँग्रेस प्रत्येकी १ सदस्य आहे. विद्यमान सभापती असलेले शिवसेनेचे संजय पावशे यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपला. यंदा भाजपाचा सभापतीपदाचा दावेदार होता, परंतु स्थायी समितीचे सभापतीपद, त्याचबरोबर आगामी पदरात पडणारे महापौरपद आणि शिक्षण समिती सभापतीपद पाहता परिवहन सभापतीपद पुन्हा शिवसेनेकडे जाण्याचे संकेत होते. मात्र, सलग दोन वर्षे सभापतीपद शिवसेनेने आपल्याकडे ठेवल्याने यंदा ते भाजपाला देण्यात आले.मागील सभापतीपद डोंबिवलीला मिळाले असताना यंदा म्हस्के यांच्या बिनविरोध निवडीमुळे ते कल्याणला मिळाले आहे. म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महापौर राजेंद्र देवळेकर, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायीचे सभापती राहुल दामले, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांच्यासह शिवसेना आणि भाजपाचे परिवहन सदस्य आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. म्हस्के यांनी प्रभारी सचिव संजय जाधव यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला.एक महिन्याचे वेतन देणारमजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे आणि धडक युनियनचे अभिजित राणे यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. या वेळी कर्मचाºयांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.त्यावर वेलरासू यांनी एक महिन्याचे थकीत वेतन तातडीने देण्याची व्यवस्था करतो. आणखी एका महिन्याचे थकीत वेतन १५ मार्चपर्यंत देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन या वेळी आंदोलनकर्त्यांना दिले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण