शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी कारागीर राजीनामा प्रकरण : सेना-मनसे आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:51 IST

केडीएमटीचे प्रमुख कारागीर अनंत कदम यांच्या राजीनामा प्रस्तावावरून शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे बुधवारच्या परिवहनच्या सभेत आमने-सामने आले.

कल्याण : केडीएमटीचे प्रमुख कारागीर अनंत कदम यांच्या राजीनामा प्रस्तावावरून शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे बुधवारच्या परिवहनच्या सभेत आमने-सामने आले. कदम यांचा राजीनामा मागे घेण्याच्या प्रस्तावाचा कोणताही विचार न करता तो तत्काळ मंजूर करावा, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली होती, तर विधी विभागाचा अभिप्राय आल्यानंतर निर्णय घेऊ, असे चव्हाण यांचे म्हणणे होते. त्यामुळे सभापती सुभाष म्हस्के यांनी मध्यस्थी करत हा प्रस्ताव तूर्तास स्थगित ठेवत असल्याचे जाहीर केले.कार्यशाळा व्यवस्थापकाची जबाबदारी असलेल्या कदम यांनी २१ सप्टेंबर २०१७ ला राजीनामा दिला होता. तत्पूर्वी १६ सप्टेंबरपासून ते विनासंमती व कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर होते. दरम्यान, २७ आॅक्टोबर २०१७ ला राजीनामा मागे घेत असल्याबाबत उपक्रमाला त्यांनी पत्र दिले होते. याप्रकरणी केडीएमटी प्रशासनाने विधी विभागाकडे याबाबतचे मार्गदर्शन मागितले होते. परिवहन समितीनेही विधी विभागाकडून अभिप्राय मागवावा, त्यानंतर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. मात्र, बुधवारच्या सभेत पुन्हा कदम यांचा राजीनामा मागे घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.यावेळी झालेल्या चर्चेत प्रशासनाला याआधी विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे समितीला असलेल्या अधिकारात कदम यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी लावून धरली. तर, समितीने आदेश दिला आहे, पण विधी विभागाचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. यावेळी दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम होते. यात म्हस्के यांनी मध्यस्थी करत समितीने मागितलेल्या विधी विभागाच्या अहवालानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेजाहीर केल्यानंतर कदम यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.बसगाड्यांमध्ये सीएनजी कीट बसवाप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच पर्यावरणसंतुलनासाठी उपक्रमातील बसगाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिझेल इंजीनच्या बदली सीएनजी कीट बसवण्याबाबतचा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्तावही चव्हाण यांनीच मांडला होता.सीएनजी केंद्र उभारणीचादेखील विचार व्हावा तसेच यासाठी खंबाळपाडा आगाराचा विचार व्हावा, अशी उपसूचना अनुक्रमे भाजपाचे सदस्य संजय राणे आणि सेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी केली.उत्पन्नासाठी जाहिरातीचा आधारकेडीएमटीची बिकट अवस्था पाहता उत्पन्नाचे स्रोत म्हणून परिवहन उपक्रमाच्या गणेशघाट, वसंत व्हॅली आणि खंबाळपाडा आगार येथील दर्शनी भागात होर्डिंग्ज उभारून जाहिरात फलक उभारण्याचा प्रस्ताव चव्हाण यांनी मांडला होता. तो एकमताने मान्य करण्यात आला.परिवहनच्या ताब्यातील मोकळ्या भूखंडावरहीजाहिरात फलक लावण्याबाबत निविदा प्रक्रियेतून कंत्राट देऊन त्या माध्यमातून उत्पन्न मिळवावे, असे मत यावेळी मांडण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका