शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या बाबू गेनु शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटली सहलीची मजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 17:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.

ठळक मुद्दे डोळखांब येथिल आजापर्वतावर गेली होती सहल नगसेवक साई शेलार यांचा उपक्रम

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपत आले मात्र अद्याप त्यांच्या सहलीचा पत्ता नाही. पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनीही मनमोकळेपणे राहण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य, स्व. शिवाजी शेलार हे नेहमी खंबाळपाडा परिसरातील महापालिका शाळा क्र.७० बाबुगेनू शाळेची सहल नेत असत. त्यांचा सहलीचा वारसा आता नगरसेवक साई शेलार यांनी चालवला असून यंदाही १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी डोळखांब येथिल आजा पर्वत येथे शाळेची सहल नेली होती.त्या सहलीला प्राथमिक शाळेचे ५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह माजी नगरसेविका शिल्पा शेलार या देखिल मुलांची काळजी घेण्यासाठी सहलीला गेल्या होत्या. मुलांनी तेथे दिवसभर खेळ, गप्पा, मस्ती, धम्माल केली. त्या पर्वताच्या परिसरात एक शाळा असून तेथिल ४०० विद्यार्थ्यांसह डोंबिवली खंबाळपाडा येथिल विद्यार्थ्यांनी एकत्रपणे सामुहिक भोजन केले. गोष्टी सांगितल्या. आणि पर्वताची स्वच्छता करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. लहानग्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगत आरोग्य सांभाळणे आवश्यक असून आरोग्याची निगा कशी राखावी यासंदर्भात जनजागृती केली. सहलीला जातांना बसमध्ये गाणी, नाच यासह ऐतिहासीक गोष्टी सांगण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या सहलीचे विशेष आकर्षण झाले होते. कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्याने मुलांना सहसा बाहेरगावी नेले जात नाही, पण मग अशा माध्यमातून मुलांमध्ये पर्यटनाची आवड निर्माण करणे, सामाजिक बांधिलकी जपणे असे नानाविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न शिवाजी शेलार यांनी केला होता. तोच प्रयत्न यापुढे सुरु रहावा यासाठी साई शेलार, माजी नगसेविका शिल्पा शेलार यांनी सुरु ठेवल्याने समाधान असल्याची भावना परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. वडीलांचा वारसा पुढे चालु ठेवणे, त्यांनी दिलेला सामाजिक बांधिलकीचा मुलमंत्र जोपासण्याची ही संधी असल्याचे मत साई शेलार यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. सहलीला जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सूकता आणि परत आल्यावरचे समाधान यामधून समाधान मिळत असल्याची भावना भाजपाचे पूर्व मंडल सरचिटणीस राजू शेख यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली