शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या विद्यार्थ्यांना घडणार मुंबई दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:50 IST

‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला.

कल्याण : ‘केडीएमसीच्या विद्यार्थ्यांची सहल कागदावरच’ या शीर्षकाखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच शिक्षण विभागाने सहलीचा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी त्याच दिवशी स्थायी समितीच्या सभेत मांडला. त्याला मान्यता मिळाल्याने अखेर चार वर्षांनंतर विद्यार्थ्यांना ‘मुंबई दर्शन’ या सहलीचा आनंद लुटता येणार आहे. दरम्यान, प्रस्तावाच्या दिरंगाईप्रकरणी सभापती राहुल दामले यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना खडेबोल सुनावले. त्यावर, दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताच सहलीचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाचे अधिकारी जे. जे. तडवी यांनी दिले.मागील वर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा, यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही. परिणामी, विद्यार्थी सहलीपासून वंचित राहिले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. यंदाही सहल लांबणीवर पडली. वास्तविक नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सहल निघणे अपेक्षित होते. परंतु, शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासीन कारभाराचा फटका यंदाही बसला.शिक्षण समितीने सहलीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. यात ‘मुंबई दर्शन’ हे ठिकाण निश्चित करण्यात आले. चौथी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. परंतु, सहलीच्या प्रस्तावाला स्थायी समितीची वित्तीय मान्यता घेण्यात आली नव्हती. अखेर, बुधवारी झालेल्या स्थायीच्या सभेत हा आयत्या वेळचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी दाखल केला होता. प्रस्ताव चर्चेला येताच दामले यांनी दिरंगाई का झाली? याबाबत, प्रशासनाला जाब विचारला. या वेळी शिक्षण विभागाच्या तडवी यांनी नोव्हेंबरमध्ये हा प्रस्ताव दिल्याचे सांगत दिरंगाई झाल्याचे मान्य केले. त्यावर दामले यांनी प्रस्ताव उशिरा दाखल केल्याप्रकरणी तडवी यांना खडसावले. यापुढे प्रस्ताव कधी सादर केला जाईल, अशी विचारणाही दामले यांनी केली. यावर आॅगस्टपर्यंत दिला जाईल, असे तडवी म्हणाले. परंतु, प्रशासनाच्या कामाची धीमी गती पाहता हा प्रस्ताव शैक्षणिक वर्ष सुरू होताच सादर करावा, असे आदेश दामले यांनी या वेळी दिले.>चांगले खाद्यपदार्थ द्यासहलीच्या वेळी विद्यार्थ्यांना सकाळ-सायंकाळचा नाश्ता, दुपारचे भोजन देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकारी तडवी यांनी दिली. खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे द्यावेत, त्याचबरोबर सहलीसाठी नेल्या जाणाºया बसही चांगल्या असाव्यात, अशा सूचना सदस्यांनी केल्या. या बसची पाहणी स्थायीचे सदस्य करतील, असे दामले या वेळी म्हणाले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका