शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

होळीनंतरच केडीएमसी शाळांची टूरटूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:32 IST

मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळीच्या सणानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

कल्याण : मुंबई दर्शनाला निघणा-या केडीएमसीच्या शाळेच्या सहलीला आता होळीच्या सणानंतरचा मुहूर्त मिळणार आहे. सहलीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या नेहरू तारांगणाची दुरूस्ती लांबणीवर पडल्याने सहलीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ही दुरूस्ती २ मार्चपर्यंत चालू राहणार असल्याने उन्हाचे चटके सहन करीत ऐन परीक्षेच्या तोंडावर सहलीचा आनंद लुटण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे. याला शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरला असताना २७ फेब्रुवारीला सहल निघेल, हा सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केलेला दावाही आता फोल ठरला.गतवर्षी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि केडीएमसी शिक्षण समितीची लांबणीवर पडलेली सभा यामुळे शालेय सहलीचा प्रस्ताव वेळेत मंजूर होऊ शकला नाही. परिणामी विद्यार्थी सहलीपासून वंचित राहिले. याआधी दोन वर्षे तांत्रिक कारणामुळे सहल काढण्यात आली नव्हती. यंदाही शिक्षण विभागाच्या भोंगळ आणि उदासीन कारभारामुळे सहल लांबणीवर पडली असून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद आजवर लुटता आलेला नाही. यंदा ‘मुंबई दर्शन’ ठरवण्यात आले आहे. चौथी ते आठवी इयत्तेतील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार आहे. मुंबईच्या दर्शनात नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, राणीची बाग येथे दिवसभरात मुलांना नेले जाणार आहे. परंतु सध्या नेहरू तारांगणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने २६ फेब्रुवारीपर्यंत ते बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे २६ तारखेनंतरच सहल निघेल, असे शिक्षण विभागातर्फे सांगितले जात होते. २७ फेब्रुवारीला सहल निघेल, असा दावा शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी केला होता. परंतु नेहरू तारांगणाच्या दुरूस्तीचे काम २ मार्चपर्यंत चालणार असल्याने त्यानंतरच सहल निघेल, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त नितिन नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.१ मार्चला होळी, तर २ मार्चला धुलीवंदन आहे. सुमारे साडेचार हजार विद्यार्थ्यांना सहलीला नेण्यात येणार असल्याने ही सहल टप्याटप्याने काढली जाईल. मार्चच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यापर्यंत हा सहलीचा कार्यक्रम चालेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.