शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीला मिळाल्या नऊ रुग्णवाहिका; खासदारांच्या फाउंडेशनचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:41 IST

कोरोनाच्या रुग्णांना मिळणार दिलासा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनने गुरुवारी नऊ रुग्णवाहिका दिल्या आहेत. त्यामुळे मनपाकडे आता १५ रुग्णवाहिका झाल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.

कोरोनाच्या काळात रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मनपाकडे अवघ्या सहा रुग्णवाहिका होत्या. त्यामुळे अनेक रुग्णांना खाजगी रुग्णवाहिकांचा आधार घ्यावा लागत होता. खाजगी रुग्णवाहिकांचे दर ठरवलेले असताना रुग्णांकडून जास्तीचे भाडे आकारण्यात येत होते. त्याला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जवळपास १०० रुग्णवाहिका भाड्याने घेऊन त्या रुग्णांना दिल्या जातील, असे स्पष्ट केले होते. मनपा हद्दीत जुलैमध्ये कोरोना रुग्ण वाढले. तोपर्यंत मनपाने जवळपास ८० रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. या रुग्णवाहिका आजही कार्यरत आहेत.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे फाउंडेशनतर्फे महापालिकेस रुग्णवाहिका दिल्या जातील, असे जाहीर करण्यात आले होते. २४ जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे ठाण्याला आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या नऊ रुग्णवाहिका सूर्यवंशी व महापौर विनीता राणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यामुळे मनपाकडे भाड्याने घेतलेल्या ८०, स्वत:कडील सहा आणि आता नव्याने मिळालेल्या नऊ अशा एकूण ९५ रुग्णवाहिका झाल्या आहेत. दरम्यान, एकूण रुग्णवाहिकांपैकी एक कार्डिअ‍ॅक आहे.कंत्राटी चालकांची करणार भरती - रामदास कोकरेसध्या मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची मागणीही कमी झाली आहे. परिणामी, मनपाने भाड्याने घेतलेल्या रुग्णवाहिकाही कमी केल्या जाणार आहेत. नवीन नऊ रुग्णवाहिकांसाठी पुरेसे चालक नाहीत. त्यामुळे या रुग्णवाहिका एक शिफ्टमध्ये चालविल्या जाणार आहेत. उर्वरित दोन शिफ्टमध्येही त्या चालवण्यासाठी पुरेसे चालक कंत्राटी पद्धतीने भरले जातील. या रुग्णवाहिकांचाच पुरेपूर वापर केला जाईल, अशी माहिती उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका