शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

केडीएमसीचे फेरीवाला धोरणच चुकीचे, आयुक्त मंत्रालयात गेल्याने बैठक झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:23 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांसाठी राबवले जाणारे धोरण चुकीचे आहे. शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक प्रभागात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे हे धोरण आहे. त्यानुसार, अडीचशे फेरीवाले प्रत्येक प्रभागात बसवले जाणार आहेत. परंतु, जेथे व्यवसाय होऊ शकत नाही, अशा ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हिताचे ठरणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांच्या जागी जर फेरीवाले बसवले, तर मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे कुठलाही अभ्यास न करता हे धोरण ठरवल्याचे फेरीवाला संघटनेचे नेते अरविंद मोरे यांचे म्हणणे आहे.केडीएमसी हद्दीत दोनतीन वर्षांत मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढले आहेत. या फेरीवाल्यांचे सर्वेक्षण महापालिके कडून केले जाणार आहे. मात्र, त्यासाठी भरून घेण्यात येत असलेल्या अर्जासाठी अधिकारी बक्कळ पैसे उकळत आहेत. त्यामुळे त्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही मोरे यांनी केला आहे.फेरीवाला धोरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता बैठक बोलावली होती. मात्र, वेलरासू यांना तातडीच्या कामासाठी मंत्रालयात जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे कारण दिले असले, तरी त्यांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशा शब्दांत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यामुळे एकंदरीतच प्रशासनाच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा कायम असताना त्यांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीने केलेली नाही. केडीएमसीने स्थापन केलेली शहर फेरीवाला समिती ही नगरपथविके्रता समिती म्हणून पुनर्जीवित केली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त हे स्वत: असून यात प्रमुख अधिकारी आणि फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. परंतु, वेलरासू यांनी स्वत: बोलावलेली बैठक त्यांनीच रद्द केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. काही जणांना दूरध्वनीवर बैठक रद्द झाल्याची माहिती देण्यात आली, तर काहींना केडीएमसीच्या मुख्यालयात आल्यावरच बैठक रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली.>पुढील बैठकीची तारीखही नाहीआयुक्त पी. वेलरासू यांना मंत्रालयात कामासाठी जावे लागल्याने गुरुवारी बैठक रद्द झाल्याचे आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, असे असलेतरी पुढील बैठकीची तारीख मात्र सांगितलेली नाही. प्रशासनाला फेरीवालाप्रश्नी कोणतेही गांभीर्य नाही. आयुक्तांना फेरीवाल्यांसाठी वेळ नाही, अशी टीका फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.>काटेमानिवलीत फेरीवाल्यांवर कारवाईकोळसेवाडी : कल्याण पूर्वेतील केडीएमसीच्या ‘जे’ प्रभाग क्षेत्राचे अधिकारी भागाजी भांगरे यांच्या पथकाने गुरुवारी पोलीस बंदोबस्तात काटेमानिवली येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. त्यात महापालिकेच्या शाळेसमोरील १२ पक्क्या शेड आणि चार पक्क्या टपºया जमीनदोस्त केल्या. दरम्यान, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल ते कोळसेवाडी गणपती मंदिरापर्यंतच्या दोन्ही बाजूंकडील फेरीवाले व वाहनांचे पार्किंग यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने येथील फेरीवल्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.