शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

केडीएमसी पोटनिवडणूक: उमेदवारी अर्जासाठी आज अखेरचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:50 IST

पोटनिवडणूक : सेना, काँग्रेसमध्ये लढत

कल्याण : केडीएमसीच्या रामबाग खडक प्रभागात लागलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत शिवसेना आणि काँग्रेस ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचा निर्णय कोअर कमिटीवर अवलंबून आहे. दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात कोणकोण असेल, याचे चित्र गुरुवारी समोर येईल.

रामबाग खडक प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका वैजयंती गुजर-घोलप यांनी सादर केलेले जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. नगरसेवकपद रिक्त झाल्याने या प्रभागात २३ जूनला पोटनिवडणूक होत आहे. ३० मेपासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून अंतिम दिवस गुरुवारी आहे. पण, अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे गुरुवारी अखेरच्या दिवशी कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करतो, याकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी सेनेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. या उमेदवाराचे नाव शिवसेनेने उघड केलेले नाही. काँग्रेसतर्फे ओबीसी सेलचे कल्याण शहर जिल्हाध्यक्ष रवींद्र परटोले हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली. दरम्यान, मनसे पोटनिवडणूक लढवणार की नाही, याचाही निर्णय उद्याच होणार आहे.

भाजपचा निर्णय गुलदस्त्यातमहापालिकेच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढले होते. या निवडणुकीनंतर युती झाली आहे. या पोटनिवडणुकीत युतीचा उमेदवार असेल की, भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भात कल्याण पश्चिमचे भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपतर्फे उमेदवार उभा करायचा की नाही, याचा निर्णय आमची कोअर कमिटी घेईल, पण अद्याप निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत युती असल्याने पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.