शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 06:48 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. लाचखोरी प्रकरणात महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याविरोधात ही कारवाई झाली आहे.सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या दोघा लिपिकांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती ३५ लाख देण्याचे ठरले. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी दुपारी ३ वाजता पालिका कार्यालयात स्वीकारताना त्यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिघांनाही गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली.घरत यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी महासभेने निलंबनाचा ठराव मंजूर केला होता. मात्र, त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ केली जात होती. घरत हे पालिकेचे अधिकारी की सरकारचे तसेच महासभेचा ठराव हा शासकीय की अशासकीय, या कचाट्यात हा मुद्दा अडकला होता. मात्र, राज्य सरकारने घरत पालिकेचे अधिकारी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईची जबाबदारी आयुक्तांवर होती. परंतु, ती झालेली नव्हती.दरम्यान, लाचलुचपत विभागाने घरत यांच्या दोन गाड्यांची कसून झडती घेतली. त्याचबरोबर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.राज्यमंत्र्यांशी जवळीकघरत यांची मंत्रालयापर्यंत ‘पोच’ असल्याची चर्चा नेहमी पालिका वर्तुळात रंगत असे. एका राज्यमंत्र्यांच्या ते जवळचे असल्याचे मानले जात. असे असतानाही त्यांच्यावर कारवाई झाल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.२३ वर्षांत ३१ लाचखोर केडीएमसीच्या १९९५च्या लोकप्रतिनिधी राजवटीपासून आजपर्यंत २३ वर्षांच्या कालावधीत ३१ लाचखोर अधिकारी, कर्मचारी तर दोन आजी-माजी नगरसेवकांना लाच प्रकरणात अटक झाली आहे.कल्पेश जोशी यांनी वाटले पेढेडोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींवर कारवाई करावी, या मागणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ११ दिवसांपासून कल्पेश जोशी यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, संबंधित अधिकारी त्यांना दाद देत नव्हते. घरत यांना लाच घेताना पकडल्याचे जोशी यांना समजताच त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.भ्रष्ट अधिकाºयांवर कारवाईची मागणीघरत यांच्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसुद्धा त्यांची तक्रार केली होती. त्याबद्दल घरत यांना वारंवार समजही देण्यात आली होती. मात्र, हे अधिकारी इतके निर्ढावले आहेत की, भ्रष्टाचार कमी करायचा सोडून उलट अजून भ्रष्टाचाराला गती देत बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. अशा अधिकाºयांवर कडक कारवाईची मागणी फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCorruptionभ्रष्टाचारSanjay Gharatसंजय घरतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArrestअटक