शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

काव्यमैफलीतून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By admin | Updated: July 3, 2017 06:23 IST

शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध कविता आगरायन काव्यमैफलीत सादर झाल्या. यात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या, भूमिपुत्रांच्या व्यथा मांडणाऱ्या कवितांचादेखील समावेश होता. शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवालदेखील कवितांच्या माध्यमातून करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते, साडेबारा टक्के कायद्याचे प्रणेते दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पनवेल येथे आगरी-मराठी कवितांची मैफल ‘आगरायन’ आयोजित करण्यात आली होती. दिबांना आगळीवेगळी काव्यमय आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने केले होते. पनवेलच्या महात्मा जोतिबा फुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मैफलीची सुरुवात गायक-वादक लोमहर्ष भगत आणि सुजित पाटील यांनी गिटारसोबत ‘मिठाला जागलेलु’ हे गीत दिबांना अर्पण करून केली. त्यानंतर, ‘ब आणि बा’ ही आई आणि बाबांचे महत्त्व सांगणारी कविता डॉ. अनिल रत्नाकर यांनी सादर केली. आजही शेतकऱ्यांचे हाल तेच आहेत, हे सांगत प्रकाश पाटील यांनी ‘भरोसा’ ही कविता सादर केली. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता आणि आताच बीजेपीच्या काळात कालपरवा नेवाळी येथे शेतकऱ्यांवर पॅलेटगनचा वापर करण्यात आला. सरकारला शेतकरी आतंकवादी वाटत आहे का, असा सणसणीत सवाल करत ‘नेवाळी-एक इशारा’ ही आगरी बोलीतील कविता ज्ञानेश्वर चिकणे यांनी सादर केली. दिबांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले. त्यांनी १०० हून अधिक शाळा काढल्या. याचाच दाखला देत, शिक्षणाचे महत्त्व पटवत ‘डावा डोला लवला’ ही कविता गजानन पाटील यांनी सादर केली. शेतकऱ्यांसाठी झटणारा ‘शेतकऱ्यांचा बा’ ही कविता सर्वेश तरे यांनी सादर केली. नगरसेविका रंजना केणी यांनी ‘जमीन’ ही कविता सादर करत भूमिपुत्रांच्या व्यथा मांडल्या. दि.बा. पाटलांच्या स्मृती जागवण्यासाठी खास विजय गायकर आणि सर्वेश तरेंनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. प्रस्तुत कार्यक्र मास दिबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पुत्र आणि कन्या अतुल पाटील, अंजली भगत उपस्थित होते.