शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कातकरी उत्थान अभियानास गालबोट ; मुरबाड तालुक्यातील कातकरी कुटुंबाचे घरे तोडूनही पोलिसांसह प्रशासन बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 19:43 IST

इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाचएका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केलेपोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाहीनुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले

ठाणे : देशभर ज्या दिवशी सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच मुरबाड तालुक्यातील इंदे गावामधील एका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केले.त्यांची दखल महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी देखील घेतली नाही, यामुळे कातकरी उत्थान अभियानास गालबोट लागून अधिका-यांची निष्काळजी उघड झाली.आदिवासी - कातकरी समाजाच्या सर्वांगिण विकासा करीता कातकरी उत्थान अभियान राबवले जात आहे. केवळ कागदावर रंगवण्यात येत असलेल्या या अभियानाचा अद्यापही भरीव लाभ कातकरी कुटुंबियाना झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अ‍ॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.याशिवाय ठाणे जिल्हाधिका-यांसह विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात ही दुर्दैवी घटना आणल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात इंदे गावातील एका वृद्ध कातकारी जोडप्याचे झोपडे १४ एप्रिल रोजी दुपारी तोडले. त्यांना बेघर केले गेले. त्याच दिवशी संध्याकाळी स्थानिक टोकावडे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या कातकरी वृद्धेला चौकशी करू, असे फक्त आश्वासन देऊन त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्याना दिलेले पत्रात करण्यात आला. गेल्या वर्षी कातक-यांच्या घरठान विषयी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून त्यांच्या घरांच्या नोंदींचे आदेश सर्व जिल्ह्यातील महसूल अधिका-यांना दिले आहे.या जोडप्याच्या झोपडीची नोंद शासन दरबारी आहे. असे असतानाही बिगर आदिवासी जमीन मालकाने या आदिवासिना हाकलून लावण्यासाठी त्यांचे घरच तोडून त्यांना बेघर केले आहे. पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी गुरूवारी १९ एप्रिल रोाजी स्थानिक श्रमिक मुक्ति संघटनेतर्फे तहसीलदाराना पत्र दिले व करवाईची मागणी केली. नुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जीव घेण्या उष्णतेच्या लाटेत हे जोडपे उघड्यावर पडले आहे. कोंकण विभागात गाजावाजाने सुरु असलेल्या कातकरी उत्थान अभियानाच्या कार्यक्रमास या दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. तातडीने व गंभीरतापूर्वक लक्ष घालून कठोर करवाई तसेच या कुटुंबाच्या निवार्याची सोया करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे...........

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार