शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमधील ३३ आदिम कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट, कातकरी कुटुंबांना शासकीय ओळख कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 09:51 IST

जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे.

- रवींद्र साळवेमोखाडा : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे जव्हार तालुक्यातील आदिम ३३ कातकरी कुटुंबांकडे शासकीय ओळखच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.जव्हारपासून १६ किमी अंतरावर असलेल्या झाप ग्रामपंचायतीमधील आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या धोंडपाड्यात १५० घरांची लोकवस्ती आहे. या पाड्यावरील लोकसंख्या ६३७ आहे. तर कातकरी समाजाची ५५ घरे असून, २३० लोकसंख्या आहे. दशरथ तुळशीराम जाधव (वय २६) यांच्या कुटुंबात आई, पत्नी, एक बहीण आणि तीन मुली असा परिवार आहे. पण, या कुटुंबाकडे स्वतःची शेती नाही. आठ महिने स्थलांतरित होऊनच हे कुटुंब उदरनिर्वाह करतात. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे या कुटुंबीयांकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, जातीचा दाखलाच काय तर कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. यामुळे कोणत्याच योजना या कुटुंबापर्यंत पोहोचत नाहीत. हे एकच कुटुंब असे आहे असे नाही, तर अशी ३३ कुटुंबे तिथे आहेत, ज्यांच्याकडे अद्यापही कोणतीच शासकीय कागदपत्रे नाहीत. त्यामुळे हे लोक बेघर आहेत. यामुळे ही कुटुंबे स्थलांतरित होण्याच्या अगोदरच येथे कॅम्प आयोजित करून या कुटुंबांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी बविआचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी केली आहे.इतर समाजापेक्षा अगदी वेगळी जीवनशैली जगणारा कातकरी बांधव कायमच गावकुसाबाहेर राहिला आहे. त्यांच्याकडे मालकीची जमीन नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरू झाल्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. रोजगारासाठी दिवाळी संपताच वीटभट्टी, बांधकामाच्या ठिकाणी  स्थलांतरित व्हावे लागते.

ढोरमेहनत अन् तुटपुंजी कमाई 

    वीटभट्टीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते.     नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापणे, भट्टी रचणे आदी कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात. या बदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्यापुरते पैसे मिळतात.    व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोरमेहनत अन् कमाई तुटपुंजी अशी स्थिती आहे.

टॅग्स :palgharपालघर