शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर केदार शिंदे लिखित बॉम्बे मेरी जान एकांकिका सादर,एक निर्णयच्या परिसंवादात रसिक दंगले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 2:50 PM

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना आपला हक्काचा वाटणारा अभिनय कट्टा विविध कलाकृती सादर करून प्रत्येक कलाकाराला नक्कीच व्यासपीठ मिळवून देण्यात यशस्वी ठरला आहे. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर बॉम्बे मेरी जान एकांकिका सादर,एक निर्णयच्या परिसंवादात दंगले रसिक स्टारफिश स्पोर्ट्स अकॅडमीच्या जलतरणपटूंचा अभिनय कट्ट्यावर सन्मान

ठाणे : ४०९ क्रमांकाचा यशस्वी कट्टा प्रेक्षकांच्या गर्दीत पार पडला. निमित्त होते एकांकिका ,जलतरणपटूंचा सन्मान , एक निर्णय या चित्रपटाच्या टिमसोबतच्या संवादाचे. कट्ट्याचे दीपप्रज्वलन पुरुषोत्तम देवस्थळे या ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधींनी केले. अभिनय कट्ट्यावर केदार शिंदे लिखित व कदिर शेख दिग्दर्शित बॉम्बे मेरी जान या एकांकिकेने उपस्थित रसिकांची मनं  जिंकली.

 मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना त्याचा मोबदला मिळतो या हव्यासापोटी  चाळीतील एका कुटूंबात आपला नवरा मृत पावला हे दाखवून त्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे असतं  कि तिचा नवरा जिवंत  असतो या दरम्यान घडणाऱ्या घटना विनोदी अंगाने मांडण्याचा उत्तम प्रयत्न कदीर शेख यांनी केला.अभिनय कट्ट्याच्या परेश दळवी , विजया साळुंखे , रोहिणी राठोड , शुभांगी भालेकर , डॉ मौसमी घाणेकर , रुक्मिणी कदम, उत्तम ठाकूर , सहदेव साळकर , सहदेव कोळंबकर , शनी जाधव , आतिष जगताप , ओंकार मराठे , शुभम कदम , महेश झिरपे , चिन्मय मौर्य , रोहित सुतार आदींनी आपल्या भूमिका साकारल्या. एकांकिकेचे नेपथ्य रोहित सुतार , वैभव पवार , प्रकाश योजना रोहिणी थोरात , रंगभूषा दीपक लाडेकर व पार्श्वसंगीत कुंदन भोसले यांनी केले. मानव मोरे, वेदांत गोखले, आर्यन डोके, सर्वेश डोके, हर्ष पाटील, नितीन मेनन, ईशा शिंदे, आशय दगडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनय कट्टयातर्फे सर्वांचे सन्मान करण्यात आले. स्विझर्लंड, झुरीच लेक येथे ४ ऑगस्ट २०१९ मध्ये होणाऱ्या ३२ व्या श्री चिन्माॅय मॅरेथॉन स्विम या स्पर्धेसाठी २६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी स्टार फिश स्पोर्ट्स अकॅडमीचे जलतरणपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच स्टार फिश स्पोर्ट्स अकॅडमी चे कोच अतुल पुरंदरे, विजय ओजळे, मनोज कांबळे, कैलाश आखाडे  यांना मार्गदर्शनाप्रित्यर्थ सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. मालवण चिवला बीच येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ९ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत आयुषी आखाडे हिने  प्रथम क्रमांकाच्या सुवर्ण पदकासह फास्टेस्ट स्वीमर चे पारितोषिक पटकावले. अथर्व दत्ताराम गवस याने विविध राज्यस्तरीय  बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले.   सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण  संघटनेच्या विशेष मुलांच्या स्पर्धेत अन्मय मेत्री याने  सिंधुदुर्ग येथे १ कि. मी अंतर यशस्वी पणे पार पाडले. स्विझर्लंड, झुरीच लेक येथे ४ ऑगस्ट २०१९ मध्ये होणाऱ्या ३२ व्या श्री चिन्माॅय मॅरेथॉन स्विम या स्पर्धेसाठी २६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी स्टार फिश स्पोर्ट्स अकॅडमीचे जलतरणपटू म्हणून निवड झाली आहे. नववर्षासाठी प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो, एखादा निर्णय घेतो. असाच एक निर्णय अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला. ‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. नव्या वर्षात त्यांचा ‘एक निर्णय’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट येत्या १८ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.‘हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असून त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मी आता एक एक पाऊल टाकत आहे. माझ्या सगळ्या आप्तस्वकीयांची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंतचा हा प्रवास करू शकलो. चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या कथेला पूरक आणि पोषक अशी चार वेगवेगळ्या मूडची गाणी ‘एक निर्णय’ या चित्रपटात आहेत. अंजली मराठे, ऋषिकेश कामेरकर, निहिरा जोशी-देशपांडे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले या सुप्रसिद्ध गायकांनी ही गाणी गायली असून, गाण्यांचे गीतकार वैभव जोशी तर संगीतकार कमलेश भडकमकर आहेत. रोहन श्रीरंग देशमुख याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे. ‘आपण केलेल्या अनेक कामांपैकी काही ठराविक कामं अशी असतात जी लोकांसमोर येण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत असतो. तसंच या चित्रपटासाठी लिहिलेली गीते लोकांसमोर येण्याची मी वाट बघत होतो’ अशा भावना गीतकार वैभव जोशी यांनी व्यक्त केल्या. तर ‘खूप दिवसांनी चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी ‘एक निर्णय’ मुळे मला मिळाली, त्यात वैभव जोशी सारख्या प्रतिभावान कवीचे शब्द समोर असल्यामुळे संगीत देण्याचा हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय होता’ असं म्हणत कमलेश भडकमकर यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. सुबोध भावे, मधुर वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, कुंजीका काळवींट या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडे यांचे असून कला दिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक याचं असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. स्वरंग प्रॉडक्शनची ही पहिलीच निर्मिती आहे. १८ जानेवारीला ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई