शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
4
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
5
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
6
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
7
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
8
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
9
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
10
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
11
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
12
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
13
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
14
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
15
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
16
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
17
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
18
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
19
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
20
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला लक्ष्य करण्याकरिता कपिल पाटील काँग्रेसच्या निशाण्यावर’; भिवंडी लोकसभा मतदारसंघाकरिता ओबीसी उमेदवाराचा शोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:00 IST

ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : भिवंडी लाेकसभा मतदारसंघातून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना आव्हान देण्याकरिता काँग्रेसकडून ओबीसी प्रवर्गातील तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात भाजपला धूळ चारायची तर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर कब्जा करायचा, असे काँग्रेसला वाटत आहे. भिवंडीतील न्यायालयात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करून त्यांना बेजार केले गेले. त्याचा वचपा काढणे हाही हेतू असल्याचे संकेत नेत्यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यात भाजपला आव्हान द्यायचे तर भिवंडीचा काँग्रेसला गड मजबूत करून कपिल पाटील यांच्या राजकीय साम्राज्याला आव्हान द्यायचे, हाच काँग्रेसचा इरादा आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भिवंडी लाेकसभेच्या निवडणुकीकरिता सहा तगड्या उमेदवारांचा पर्याय पक्षाच्या उमेदवार निवड समितीसमोर ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी जारी केलेल्या सहा निकषांमध्ये बसणाऱ्या ओबीसी नेत्यांचा शाेध घेतला जात आहे. माजी खासदार, आमदार अथवा चांगला संघटनात्मक अनुभव असलेली आणि काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी  जोडलेली व्यक्ती उमेदवार म्हणून देण्याचा पक्षाचा विचार आहे.

 नवी दिल्ली येथील काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अजय सिंह यादव यांनी राज्याच्या भानुदास माळी यांना या सहा निकषांवर उमेदवारांचा शाेध घेऊन शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत.  भिवंडी लाेकसभेतून माजी खासदार सुरेश टावरे, काँग्रेसचे ओबीसी नेते डाॅ. प्रकाश भांगरथ, माजी आमदार ताहीर माेमीन, राकेश पाटील आणि दयानंद चाैधरी आदी नेत्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भांगरथ यांनी या वृत्तास दुजाेरा दिला.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटील