शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कांदळवने होणार आता बफर झोन, भूमाफियांना बसणार वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 04:48 IST

मुंबईसह ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक लाभ : भूमाफियांना बसणार वेसण

नारायण जधव

ठाणे : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार भागांत खारफुटी अर्थात कांदळवनांवर होणारे अतिक्रमण आणि त्यांची कत्तल रोखण्याबाबत महापालिकांना येणाऱ्या अपयशाबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जाग आलेल्या नगरविकास विभागाने महापालिकांसह नियोजन प्राधिकरणांनी आपल्या विकास आराखड्यात कांदळवनांची जागा बफर झोन म्हणून दर्शवावी, असे निर्देश दिले आहेत. या आदेशाचा लाभ ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर येथील कांदळवनांना होऊन त्यावर भराव टाकून उत्तुंग इमारती बांधणाºया भूमाफियांसह रेतीमाफियांना वेसण बसणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका ८७/६ नुसार राज्य सरकारची कानउघाडणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांनी कांदळवनांची जागा नगररचना कायदा १९६६ च्या कलम ५४ नुसार बफर दर्शवण्यास सांगावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, जाग आलेल्या नगरविकास विभागाने १३ जून रोजी खास अध्यादेश काढून राज्यातील कांदळवने आणि त्यापासूनच्या ५० मीटर क्षेत्राचा परिसर बफर झोन म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था, विकास प्राधिकरणे आणि नियोजन मंडळांनी आपल्या विकास आराखड्यांमध्ये दर्शवावा, असे बजावले आहे.भारतीय वनस्थिती अहवाल २०१५ नुसार राज्याचे कांदळवन क्षेत्र २२२ चौ.कि.मी. होते. ते २०१७ मध्ये वाढून ३०४ चौ.कि.मी. इतके झाले आहे. यामध्ये ८२ चौ.कि.मी.ची भरघोस वाढ नोंदवण्यात आली आहे. ती प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. या विस्तृत किनाºयाला अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्था (इको सिस्टीम) वास्तव्याला आहेत. जसे कांदळवने, कोरल्स, खडकाळ क्षेत्र, वाळूचे किनारे, दलदल. इ. किनारी आणि सागरी वातावरण फक्त विविध प्रकारची जैवविविधताच सांभाळत नाही, तर अनेक प्रकारच्या पर्यावरणीय व्यवस्थासुद्धा सांभाळते. ज्यावर समुद्रकिनारी राहणाºया अनेक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे किनारी आणि सागरी पर्यावरण सांभाळणे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कांदळवनांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये सर्व शासकीय कांदळवन जमिनींना राखीव वनांचा दर्जा देऊन स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती केली होती.राज्यात ३० हजार हेक्टर कांदळवनेमहाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत मिळून ३०४ चौ.कि.मी.ची कांदळवने (कव्हर) आहेत. परंतु, कांदळवनांचे एकूण क्षेत्र (लॅण्ड) ३० हजार हेक्टरच्या आसपास आहे. आतापर्यंत १५ हजार ८८ हेक्टर शासकीय जमिनीवर तसेच १७७५ हेक्टर खाजगी क्षेत्रावरील कांदळवनांना ‘राखीव वने’ व वने म्हणून दर्जा देण्यात आला आहे.स्थानिक संस्थांकडून होतेय कांदळवनांवर अतिक्रमणच्कोकणातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार, पनवेल यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आपल्या विविध विकास प्रकल्पांसाठी कांदळवनांवर सतत अतिक्रमण होत होते.

टॅग्स :thaneठाणेforestजंगल