शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

लेखणीबंद आंदोलनाचा कामगार सेनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:03 IST

भाईंदर पालिका : निर्णय होऊनही अंमलबजावणीचा पत्ताच नाही

 लोकमत न्यूज नेटवर्कमीरा राेड :  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महापालिकेत सहा वेळा बैठका व निर्णय होऊनही अंमलबजावणी मात्र केली जात नाही. तर याबाबत वेळ मागूनही कर्मचाऱ्यांच्या संघटनेलाच वेळ दिला जात नसेल तर लेखणी बंद आंदोलन करू, असा इशारा शिवसेनाप्रणीत मीरा-भाईंदर कामगार सेनेने पालिका आयुक्तांना दिला आहे.

मीरा-भाईंदर कामगार सेनेच्या वतीने सरचिटणीस श्याम म्हाप्रळकर यांनी आयुक्तांना या इशाऱ्याचे पत्र दिले आहे. त्यामध्ये पात्र सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये डावलणे, वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना वर्ग ३ वर पदोन्नती देणे, १२ व २४ वर्षे सेवा केलेल्यांना पदोन्नतीचा लाभ, सुटीच्या दिवशी काम केलेल्याचा मोबदला द्या, २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे, रोख रकमेचा विमा, परिचारिका आदींना पदोन्नती द्यावी, पालिकेचे सभागृह आदी वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना मोफत, भाड्याने द्यावेत आदी ३२ मागण्या दिलेल्या आहेत.

प्रशासनासोबत जानेवारी २०१७ ते जानेवारी २०२० दरम्यान सहा वेळा बैठका झाल्या आहेत. लेखी आश्वासने देऊनही अजूनही पूर्तता केली जात नाही. आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असता पालिकेने आश्वासने दिल्याने ती स्थगित करण्यात आली. पण मागण्यांसाठी विनंती करूनही अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त मुख्यालय यांनी वेळ दिला नाही.उपायुक्त अजित मुठे यांनी ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्यांची यादी पुन्हा देण्यास सांगितले. ती देऊनही तीन महिने झाले तरी कार्यवाही केली गेली नाही. 

माेठी संघटना२१ नोव्हेंबरपर्यंत वेळ न दिल्यास २४ नोव्हेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा म्हाप्रळकर यांनी दिला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेची मीरा-भाईंदर कामगार सेना ही सर्वात मोठी कर्मचारी - अधिकाऱ्यांची संघटना आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक