शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

कल्याण ग्रामीण भागात प्रतिभावान खेळाडू तयार होतील- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 18:07 IST

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८च्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मांडले.

कल्याण - ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व पाठिंबा दिल्यास अनेक प्रतिभावान खेळाडू तयार होतील, असे विचार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण आमदार चषक २०१८च्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मांडले. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील असे ते म्हणाले.आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ येथील कोडब मैदानात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये वाकलण संघाने अंतिम विजेतेपद तर नवापाडा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, आमदार रुपेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेता संतोष जुवेकर, नगरसेवक संजय भोईर, अमर पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील उपस्थित होते.आमदार चषक २०१८ स्पर्धेत ४८ संघांनी प्रवेश घेतला असून दररोज ९ सामने खेळविण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक २ लक्ष ५० हजार व चषक वाकलन संघ, द्वितीय १ लक्ष ५० हजार व चषक नवापाडा, तृतीय ७५ हजार व चषक उत्तरशिव आणि चतुर्थ ५० हजार व चषक मोठागाव तसेच मॅन ऑफ द सीरिज फोर व्हीलर गाडी मनोज उर्फ पिंट्या जोशी नवापाडा, उत्कृष्ट फलंदाज सुरेंद्र लोखंडे नावापाडा टू व्हीलर बाईक व गोलंदाज मोतीराम भोईर वाकलन टू व्हीलर बाईक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रतीक मढवी नावापाडा मोबाईल फोन व लकी ड्रॉ म्हणून टू व्हीलर बाईक श्रेयश गायकवाड आदी बक्षिसे देण्यात आली. आमदार चषक २०१८ स्पर्धेसाठी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.सदर स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना तसेच अलिमकर ११ क्रिकेट क्लब शिळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शिळगाव, एस. बी. ग्रुप यांच्या माध्यमातून उत्कृष्टरीत्या करण्यात करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवासेना कळवा-मुंब्रा अधिकारी सुमित सुभाष भोईर व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदे