शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कल्याण-ठाणे-वसई जलवाहतूक डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:02 IST

ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक

ठाणे : ठाणे पालिकेच्या महत्त्वांकाक्षी जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वसई - ठाणे - कल्याण या मार्गांवर डिसेंबरपर्यंत वाहतूक सुरु होईल, अशी माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी दिली. ज्या ठिकाणी पाण्याला खोली असेल त्या मार्गावर बोट धावणार असल्याचे सांगून खाजगीकरणातून म्हणजेच जीसीसी तत्त्वावर या बोटी धावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रकल्पामुळे वेळ, पैशाची होईल. वाहतूककोंडीतून सुटका होईल, असा दावा त्यांनी केला. यावेळी महाराष्टÑ मेरीटाईम बोर्डचे सीईओ विक्रमकुमार, गोवा आणि कोच्ची शिप यार्डचे अधिकारी, इतर पालिकांचे अधिकारी उपस्थित होते. पहिल्या टप्यात वसई - मीरा-भाईंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा-भिवंडी- कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्गआहे. यासाठी ६५० कोटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे. कोलशेत येथे या जलवाहतुकीचे मल्टी मॉडेल हब विकसित केले जाईल. तेथे बोटी दुरुस्त केल्या जातील. पहिल्या टप्प्यासाठी पालिका ८ ते १० प्रवासी क्षममेच्या दोन ते तीन बोट घेणार आहे.पहिल्या टप्यातील डीपीआर तयार झाला असून त्याचे सादरीकरण दोन दिवसात दिल्लीत होणार असून त्यात त्याला तत्वत: मंजुरी मिळेल.मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरावर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला चांगला महसूल मिळेल. त्यामुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होईल. पर्यटनसाठीही जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन आणि मुख्य महामार्गापासून जलवाहतूक किती अंतरावर असेल याचाही अभ्यास करण्यात आला आहे. वसईला रेल्वे स्टेशनपासूनचे अंतर हे ४ किमी आणि आणि रस्त्याचे अंतर ० किमी असणार आहे. तर कल्याण जेटीचे अंतर हे रेल्वे स्टेशपासून अवघे १.७१ किमी असणार असून रस्त्यापासून ते ५० मीटरवर असणार आहे. तर ठाण्यातील कोलशेतचे हबचे अंतर हे कळवा रेल्वे स्टेशनपासून ५ किमी आणि रस्त्यापासून ७० मीटर असेल.या जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्यात ठाणे, नवी मुंबई, मुंबई याचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केला आहे. पहिल्या टप्यासाठीचा संपूर्ण निधी हा केंद्राकडून मिळणार आहे. परंतु, दुसºया टप्यासाठीचा निर्णय अद्याप झालेला नाही. असे असले तरी ठाणे महापालिका या दुसºया टप्याचे काम करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.