शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: कल्याणमध्ये दहीहंडी साजरी करण्यावरुन ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

By मुरलीधर भवार | Updated: September 4, 2023 18:44 IST

Kalyan Dahi Handi: -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण  -छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली आहे. पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. पोलिस आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याठिकाणी ठाकरे गटाला दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी उच्च न्यायालयाकडे या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या ५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

यंदा शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी त्यांना छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी साजरी करण्याची परवानगी दिली आहे. छत्रपती शिवाजी चौकात दहिहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनाकडे मागितली होती. त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी ठाकरे गटाला दहिहंडी उत्सव करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकाऐवजी दुसरी जागा सूचवावी असे सूचित केले आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष एक असताना तेव्हापासून छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेकडून दहिहंडी साजरी केली जात आहे. शिवसेनेत फूट पडून ठाकरे आणि शिंदे गट झाले. त्यानंतरही मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी चौकात ठाकरे गटाला दहिहंडी साजरी करण्यासाठी परवानगी दिली गेली होती. ठाकरे गटाने त्याच ठिकाणी दहिहंडी साजरी केली होती. शिवसेनेची शहर शाखाही चौकाजवळच आहे. त्यामुळे परवानगी आम्हाला नाकारण्याचे कारणच नाही.मात्र पोलिसांनी सांगितले की, ज्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्या पक्षाला परवानगी दिली आहे.

पोलिसांनी हे कारण देत ठाकरे गटाला दुसरी जागा सूचवा असे म्हटले असले तरी येत्या ७ सप्टेंबर रोजी दहिहंडी आहे. ठाकरे गटाकडे तयारीसाठी अत्यंत कमी वेळ आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित हेते. ७ सप्टेंबरपूर्वी या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे केली आहे. उद्या ५ सप्टेंबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणDahi Handiदहीहंडी