शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: आंबिवलीच्या इराणी वस्तीत चोरट्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

By मुरलीधर भवार | Updated: August 30, 2023 17:09 IST

Crime News: कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगर आले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली.

- मुरलीधर भवारकल्याण - कल्याणनजीक असलेल्या आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगर आले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. पोलिस आणि आरोपीच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली. अखेरी पोलिसांनी इराणी भामट्याचा मुसक्या आवळल्या. त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव फिरोज खान असे आहे.

पोलिस असल्याची बतावणी करुन एका इसमाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली होती या प्रकरणी अंधेरी डीएन नगर पोलिस ठाण्याचे पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. इसमाला एक लाखाचा गंडा घालणाऱ््या चोरट्याचा पोलिसांनी शोध सुरु केला. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यात त्याचा ठावठिकाणी लागला. चोरटा हा अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती समोर आली.

चोरटा फिरोज खान याला पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु केली. तो आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक वस्तीच्या आसपास दबा धरुन बसले. पोलिस  फिरोजला पकडण्यासाठी गेले असता   पोलिसांना रोखण्याकरीता त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिस आणि फिरोजच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नातेवाईकांचा प्रतिकाराला न जुमानता अखेरस फिरोजच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करुन मुंबईला घेऊन गेले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ३५ गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkalyanकल्याण