शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

‘ती’ गावे लवकरच नवी मुंबईत; एकनाथ शिंदे यांचं गावकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 08:46 IST

ठाण्यात झाली बैठक, नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत.

ठाणे : मागील दोन वेळेस नवी मुंबईतून बाहेर पडलेल्या त्या १४ गावांतील रहिवाशांनी आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार भंडार्ली, तसेच आसपासच्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याबाबत नगरविकास खात्यामार्फत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शुक्रवारी नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

भंडार्ली डंपिंगच्या मुद्द्यावरून शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथील गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळेस येथील रहिवाशांना नवी मुंबई महापालिकेत १४ गावांचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. येथील दहिसर, निघु, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबर्ली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी आदी गावांचा यात समावेश आहे. 

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवंलबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना आता पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्याचे वेध लागले आहेत. वास्तविक, पाहता नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळेस या गावांचा समावेश झाला होता. परंतु, आम्हाला महापालिका नको म्हणून येथील रहिवाशांनी विरोध करून बाहेर पडले होते. त्यानंतर पुन्हा या गावांचा समावेश नवी मुंबईत करण्यात आला होता. दोन वेळा समावेशानंतरही येथील रहिवाशांनी नाके मुरडली होती. आता मात्र नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी याच रहिवाशांनी आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य सरकाराने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात (नैना) या गावांचा समावेश केल्याने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले होते. त्यानुसार आम्हाला महापालिकाच हवी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. 

कल्याण-तळोजा रस्त्यालगत आहेत गावेशीळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण-तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून असून, ती भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेच्या वेळेस त्यांचा महापालिकेत समावेश झाला होता. परंतु, आता विकासकामे, समस्या सुटत नसल्याने या रहिवाशांनी पुन्हा महापालिकेत समावेशाची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील १४ गावे सर्व पक्षीय विकास समितीने हीच मागणी केली होती. त्यानंतर आता शुक्रवारी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत ही मागणी केल्यानंतर शिंदे यांनीदेखील याला सकारात्मक प्रतिसाद देऊन या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे