शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

कल्याण आरटीओ कर्मचाऱ्यांचे ‘लेखणीबंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:54 PM

राज्य सरकारचा केला निषेध; पदोन्नती, विविध मागण्यांकडे आंदोलनाद्वारे वेधले लक्ष

डोंबिवली : पदोन्नती व अन्य प्रलंबित विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील ३० कर्मचारी आणि अधिकाºयांनी शुक्रवारी लेखणीबंद आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला.यासंदर्भात कर्मचारी संघटनेचे सचिव मनोज सूर्यवंशी म्हणाले, वर्षानुवर्षे आम्ही एकाच पदावर कार्यरत आहोत. आमची पदोन्नती का होत नाही, याची माहिती आम्हाला मिळत नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. अनेकदा कर्मचाºयांमध्येच काम न करण्याची मानसिकता तयार होते. त्याचा परिणाम व्यवस्थेवर होतो. जनताभिमुख काम करताना येणाºया तांत्रिक अडचणी कोणीही समजून घेत नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. आरटीओ कार्यालयातील सगळ्यांनीच लेखणीबंद करून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेतला.कल्याण आरटीओ कार्यालयात ५३ पदे मंजूर असताना सध्या २७ कर्मचारी काम करत आहेत. त्यातच, वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे सर्व व्यवस्थेवर ताण येत आहे. नियोजन रोजच्यारोज फोल ठरत आहे. त्यातच, कोणालाही पदोन्नती नाही. त्यामुळेही नाराजी आहे. १९९७ मध्ये जेवढी कर्मचारी संख्या अपेक्षित होती, त्याची पूर्तता अद्यापपर्यंत केलेली नाही. २०१७ पर्यंतही कर्मचारी वाढलेले नाहीत. २०१२-१३ पासून कर्मचाºयांची भरतीही केलेली नसल्याने अनेक समस्या वाढत आहेत. कोणालाही रजा मिळत नाही, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.कल्याण आरटीओ कार्यालयामध्ये वाहननोंदणी, करभरणा, लायसन आदी कामांसाठी दररोज शेकडो नागरिक येतात. अपुºया मनुष्यबळामुळे त्यांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल कोणीही काहीही बोलत नाही. अधिकारीही वरिष्ठांकडे समस्या मांडतात की नाही, याबाबत काही स्पष्टता नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.आरटीओ कार्यालयातील आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुनील लाड, अनिता ठाकरे, प्रशांत मोहिले, गणेश आंग्रे, विशाल गोडबोले, सुषमा पाटील, सुचिता गडेकर, अरुण येवले आदी कर्मचारी उपस्थित होते.कामकाज ठप्प, उत्पन्नावर झाला परिणामलेखणीबंद आंदोलनामुळे शंभरहून अधिक दुचाकींची नोंदणी होऊ शकली नाही. तसेच लायसन, वाहनांचा करभरणा व अन्य कामांसाठी आलेल्या वाहनचालकांचे हाल झाले. दिवसभरात कोणतेही काम न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. आॅनलाइनद्वारे नोंदणी केलेल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. दिवसभरातील १८ ते २० लाखांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी मान्य केले.

टॅग्स :StrikeसंपRto officeआरटीओ ऑफीसdombivaliडोंबिवली