शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल रोकोच्या गुन्ह्याचा तपास थंडावला : रेल्वे कर्मचा-यांचा समावेश असल्याने अडथळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 14:38 IST

गँगमनवर चोरीचा गुन्हा लावल्याचा कल्याण लोहमार्ग पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी कल्याण स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यास आता चार दिवस झाले तरीही पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तपास थंडावल्याचे चित्र आहे. रेल रोकोचा प्रयत्न करणारे रेल्वे कर्मचारी असून त्यांना वेगळा न्याय का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु आहे.

ठळक मुद्देसीसी कॅमे-याच्या फुटेज तपासण्यात दिरंगाई होतेय का?१५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

डोंबिवली: गँगमनवर चोरीचा गुन्हा लावल्याचा कल्याण लोहमार्ग पोलिसांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या रेल्वे कर्मचा-यांनी कल्याण स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यामुळे १५ -२० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यास आता चार दिवस झाले तरीही पोलिसांनी संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तपास थंडावल्याचे चित्र आहे. रेल रोकोचा प्रयत्न करणारे रेल्वे कर्मचारी असून त्यांना वेगळा न्याय का? अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु आहे.विविध प्रवासी संघटनांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असून सर्वसामान्य प्रवाशांनी असे कृत्य केले असते तर त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली असती. तर मग रेल्वे कर्मचा-यांना वेगळा न्याय का दिला जात आहे? त्यांच्यावरही तातडीने कारवाई का केली जात नाही अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती.तपासाधिकारी माणिक साठे यांनीही तपास सुरु असून त्यात दोन दिवसांत फारशी गती नसल्याचे स्पष्ट केले. १५-२० जणांवर गुन्हे दाखल झाले असून साक्षीदारांची जबाब घेण्याचेही काम सुरु होते, पण सीसी कॅमे-यांचे फुटेज तपासा आणि कारवाई करा अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तसेच गँगमनची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्यामधून जे निष्पन्नास आले असेल त्यानूसार पोलिस कारवाई का करत नाहीत? रेल्वे कर्मचारी असल्याने चालढकलपणा सुरु आहे का? असे नानाविध सवाल अनुत्तरीतच आहेत. अद्यापतरी कोणताही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया तपासाधिकारी साठे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली