शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी चालवले कल्याणचे सार्वजनिक वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:02 IST

पिसवली शाळेचा उपक्रम; दोन दिवस घेतला कारभाराचा अनुभव

कल्याण : सुमारे १५५ वर्षांची परंपरा असलेले अद्ययावत आणि सुसज्ज सार्वजनिक वाचनालय दोन दिवस पिसवली शाळेच्या विद्यार्थ्यांनी चालवले. संगणीकृत, वातानुकूलित असलेल्या या वाचनालयात दरदिवशी शंभरहून अधिक वाचक येतात. पुस्तकांच्या नोंदी, त्यांची ओळख तसेच वाचनालयाचा कारभार नेमका कसा चालतो, ग्रंथपालाच्या जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून वाचनालयाचा पसारा जवळून अनुभवला.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रम तीन वर्षांपासून राबवला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या या उपक्रमात पिसवली शाळेच्या २० विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते सायंकाळी ८ वेळेत सहभाग घेतला. कथा, कविता, कादंबरी, ललित, चरित्र, नाटक, ऐतिहासिक ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, तसेच बालसाहित्याची या विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. ग्रंथपाल, कर्मचाऱ्यांचे काम, अध्यक्ष, सरचिटणीस तसेच वाचनालयाच्या सदस्यांचे काम करतात, पुस्तकांची होणारी देवाण-घेवाण याबाबत दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी कुतूहलाने जाणून घेतले.लहान मुलांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतच्या वाचनाच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची संधी यानिमित्ताने या विद्यार्थ्यांना मिळाली. महाविद्यालयीन विद्यार्थीही सभासद असून त्यांची मागणी सर्वाधिक संदर्भग्रंथांना असते, असे निरीक्षण विद्यार्थ्यांनी नोंदवले.पिसवली शाळा ही नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्र मांसाठी ठाणे जिल्ह्यात अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच वाचनाची गोडी आणि वाचनालयासंदर्भातील माहिती सविस्तर विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून हा उपक्र म हाती घेतला, असे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी सांगितले.वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मुलांशी गप्पा मारून त्यांना जिज्ञासा, वाचन संस्कृती रु जावी यासाठी वाचले पाहिजे, त्याचबरोबर लेखन करायला पाहिजे, असा सल्ला देत स्वत:चे अनुभवही सांगितले. वाचनालयामध्ये येणाºया वाचकांचे विविध अनुभव विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोगी पडतील, असेही ते म्हणाले.विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेमुलांनी पुस्तकांची देवघेव करण्याबरोबरच पुस्तकांना कव्हर घालणे, त्यांचे बायडिंग करणे, वर्तमानपत्राच्या घड्या घालणे, वाचकांनी आणलेले पुस्तके पुन्हा जागेवर नंबरप्रमाणे लावणे, नवीन सभासद बनवणे, वर्गणी याबाबत माहिती घेतली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत गौरी देवळे यांनी आभार मानले.

टॅग्स :libraryवाचनालय