शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-नगर रेल्वेमार्गास ५० वर्षांपासून मुहूर्त सापडेना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:22 IST

पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेमार्गाचे घोंगडे गेल्या ५० वर्षांपासून भिजत पडले आहे.

- नारायण जाधवठाणे : पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेमार्गाचे घोंगडे गेल्या ५० वर्षांपासून भिजत पडले आहे. माळशेज रेल्वे कृती समितीने या मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे यामार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण होऊनही केवळ राजकीय इच्छाशक्ती अपुरी पडल्यामुळे शेतकरी, नोकरदार, व्यापाऱ्यांसह विदर्भ-मराठवाड्यांच्या रेल्वे विकासात मैलाचा दगड ठरणारा हा मार्ग रखडला आहे.सर्वपक्षीय नेत्यांच्या फसव्या घोषणा आणि रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्पात करण्यात येणारी तकलादू तरतूद, एवढ्यापुरताच हा मार्ग दरवर्षी चर्चेत येतो. मात्र, पुन्हा येरे माझ्या मागल्या... म्हणत तो गटांगळ्या खात आला आहे.आता कुठे कल्याण-मुरबाडपर्यंत रेल्वे नेण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, त्यातही विद्यमान राजकारण्यांनी आपमतबली भूमिका घेऊन पूर्वीच्या टिटवाळामार्गे तो नेण्याचा मार्ग बदलून तो आता उल्हासनगरमार्गे नेण्याचा घाट रचला आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेआधी कोणतीही तयार नसताना केवळ गुगल सर्व्हेचा आधार घेऊन त्याचे भूमिपूजन उरकले आहे. मात्र, या मार्गासाठी ना जमीन संपादित झाली आहे, ना पर्यावरणाशी निगडित परवानग्या मिळाल्या आहेत. ना मातीपरीक्षण झाले आहे. केवळ, मतदारांना मूर्ख समजून त्याचे भूमिपूजन उरकले आहे.03 तासांत होईल अंतर पारमागे केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात कल्याण ते अहमदनगर मार्गावर २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित केली आहेत. तो सुरू झाल्यास कल्याण-अहमदनगर हे अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे. तसेच अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतील नाशवंत शेतमाल, दूध मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचू शकणार आहे.हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबिन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी-कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा तो आहे. यामुळे उपरोक्त गावांच्या परिसरातील पंचक्रोशीचाही विकास होणार आहे. परंतु, नव्याने विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वार्थासाठी या मार्गात बदल केल्याने तो पुन्हा लांबणीवर पडणार आहे.कल्याण-अहमदनगर रेल्वेमार्ग पुढे अहमदनगर-बीड-परळी या बांधकाम चालू असलेल्या रेल्वेमार्गाला जोडला जाऊ शकतो. परळी ते विशाखापट्टणम आणि परळी ते नांदेड-नागपूर असे रेल्वेमार्ग सध्या कार्यरत आहेत. यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाचे एक महाद्वार या कल्याण ते अहमदनगर रेल्वेमार्गामुळे खुले होऊ शकते. या रेल्वेमार्गाने केवळ अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर हे चार जिल्हेच नव्हे, तर मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना जोडधंदा मिळून त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील विशाखापट्टणम आणि देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर असणारी बीपीटी आणि जेएनपीटीसारखी बंदरे एकमेकांना रेल्वेमार्गे जोडता येणार आहेत. तसेच आणीबाणीप्रसंगी सैन्यासह शस्त्रास्त्रे, रणगाडे, युद्धाला लागणारी रसद वेगाने पोहोचवण्यासही मदत होणार आहे. शिवाय, इतर दैनंदिन सामग्रीसह कारखान्यांना लागणाºया सुट्या भागांची नेआण करणे सोपे होणार आहे.वास्तविक, कल्याण ते अहमदनगर या रेल्वेमार्गाचे इंग्रज राजवटीतच सर्वेक्षण झाल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यावर रेल्वे सुरू झाल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील स्वातंत्र्यसैनिकांना तो फायदेशीर ठरेल, अशी भीती वाटल्याने ब्रिटिशांनी पुढे काहीच हालचाल केली नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. यानंतर, स्वातंत्र्योत्तर काळात १९५०, १९७३, २०००, २००६, २०१० असे अनेकदा या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. २०१० मध्ये तर त्याचा रेल्वेच्या पिंकबुकमध्ये समावेश होऊनही तो रखडला आहे.खासगीकरणातून बांधण्याचाही विचारमधू दंडवतेंपासून ठाण्याचे माजी खासदार दिवंगत प्रकाश परांजपे यांनी या मार्गासाठी बºयापैकी पाठपुरावा केला आहे. यासाठी खासगीकरणातून तो बांधावा का, याबाबतही त्यावेळी संसदेत विचारविनिमय झाला आहे.पर्यटनासही चालना मिळेलकल्याणहून नाशिकमार्गे अहमदनगरला जाण्यासाठी वळसा घेऊन जावे लागते. हाच प्रवास कल्याणहून मुरबाड-माळशेज घाटमार्गे आळेफाट्यावरून केला, तर हेच अंतर सुमारे १०० ते १५० किलोमीटरने कमी होते.या रेल्वेमार्गात माळशेज घाट हे एक तगडे आव्हान रेल्वेसमोर आहे. यामुळेच कल्याण-नगर रेल्वेमार्गाने गती पकडलेली नाही. टिटवाळा ते मुरबाड मार्गानंतर मुरबाड ते नगर हा रेल्वेमार्ग झाला, तर या मार्गावरील शिवनेरी, हरिश्चंद्रगड, माळशेज घाट या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व वाढेल.तसेच अष्टविनायकांमधील लेण्याद्री, ओझर, कोरथनचा खंडोबा, कापर्डिकेश्वर या तीर्थस्थळांना भेटी देणाºया भाविकांचा प्रवास सुलभ होऊन पर्यटनवाढीसही मदत होईल.

टॅग्स :railwayरेल्वे