शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सप्तसुरांच्या जल्लोषात न्हाऊन निघाले कल्याणकर रसिक, स्वागत यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला झाला बहारदार कार्यक्रम 

By सचिन सागरे | Updated: April 9, 2024 15:25 IST

Kalyan News: रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली.

- सचिन सागरेकल्याण  - रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. इंडीयन मेडीकल असोसिएशन, कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले 3 दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला पश्चिमेकडील वासुदेव बळवंत फडके मैदानात "जल्लोष सप्तसुरांचा" हा अतिशय सुंदर असा सूरमयी कार्यक्रम संपन्न झाला. ज्यामध्ये नचिकेत लेलेच्या गाण्याने, आशिष पाटीलच्या मनमोहक नृत्याने, डॉ. संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेचक अदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, नववर्ष स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निखिल बुधकर, खजिनदार अतुल फडके यांच्यासह कल्याणातील विविध संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणgudhi padwaगुढीपाडवा