शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा फुलबाजार कोमेजला!

By admin | Updated: September 12, 2016 03:14 IST

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही.

कल्याणचा फुलबाजार सध्या पालिका आणि एपीएमसीच्या वादाच्या गर्तेत सापडला आहे. वापराविना पडून असलेल्या, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विक्रेत्यांना बसण्यास धड जागा नाही. माल साठवण्याची सुविधा नाही. कोल्ड स्टोअरेज नाही. त्यातच करवसुली करूनही साध्या-साध्या सुविधा देण्यात खळखळ सुरू असल्याने या बाजाराला दिवसेंदिवस अवकळा येते आहे. मुंबईनंतरचा मोठा फुलबाजार म्हणून तो विकसित होण्याऐवजी कोमेजू लागला आहे, तो नियोजनाच्या अभावामुळे. मात्र त्याबाबत ना पालिकेला खेद, ना एपीएमसीला खंत. कल्याणमध्ये पूर्वी फूल व भाजीपाला बाजार हा लक्ष्मीमार्केटमध्ये भरत होता. १९९७ पासून फुलबाजार हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एक एकर जागेवर भरु लागला. बाजार समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेला फूल बाजारासाठी एक एकर जागा हस्तांतरीत केली. दादरपाठोपाठ सगळ््यात मोठा फूल बाजार अशी कल्याणच्या फुलबाजाराची ख्याती आहे. महापालिका बाजार फी व बाजार समिती उपकर (सेस) वसूल करते. पण तेथे फूल विक्रेते आणि खरेदीदारांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. महापालिकेने फूल मार्केटसाठी उभारलेल्या शेडही मोडकळीस आल्या असून बाजाराची दुरवस्था झाली आहे. याच ठिकाणी एक मजली व दुमजली इमारत बांधून फूल विक्रेत्यांना सुविधा देण्याचा घाट बाजार समितीने घातला आहे. त्यासाठी ९ कोटी ५० लाख रुपये खर्चाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्याकरिता महापालिकेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्रही घेतले आहे. प्रत्यक्षात बाजार समितीच्या ४० एकर आवारात अनेक वास्तू विकसित करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या वापरात नाही. त्याठिकाणी गर्दुल्यांचा वावर असतो. त्यामुळे या वास्तू विकसित करुनही त्याचा उद्देश सफल झालेला नाही. तसेच त्या व्यापारी व विक्रेत्यांनाही मिळालेल्या नाहीत. फूल बाजाराची इमारत विकसित करुन पुन्हा हाच कित्ता गिरवला जाणार असेल, तर त्यातून इमारत विकासाचा उद्देश साध्य होणार नाही. लोकप्रतिनिधींना विकास कामातून केवळ टक्केवारी लाटता येईल आणि विकासाच्या खऱ्या हेतूला हरताळ फासला जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.भाजीबाजारही माघारी : कृषी उत्पन्न बाजार समितीने १९९५ मध्ये महापालिकेस ४० एकर जागेपैकी तीन हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्यास दिला होता. १९९६ मध्ये महापालिकेने एक एकर जागेवर शेड उभारली. त्याठिकाणी भाजीपाला विक्रेते स्थलांतरीत झाले. मात्र त्यांचा व्यवसाय होत नसल्यामुळे पुन्हा त्यांनी मूळ लक्ष्मी बाजाराकडेच धाव घेतली. फूल विक्रेत्यांना चांगली जागा मिळाल्याने त्यांनी पुन्हा लक्ष्मीबाजारात येणे पसंत केले नाही. १९९७ पासून त्याठिकाणी फूलबाजार भरत आहे. मात्र या फुलबाजाराची दुरवस्था झाली आहे. तेथे सोयी सुविधांची वानवा आहे.