शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कल्याण-डोंबिवली पॅटर्न विकासाचा की लाथाळ्यांचा?

By admin | Updated: February 13, 2017 04:48 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी युती तोडून परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवली

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी युती तोडून परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि भरघोस यश संपादन केले. शिवसेनेची ताकद वाढलीच पण भाजपाच्या बाहुंमध्ये दहा हत्तीचे बळ आले. त्यामुळे आता होणाऱ्या मुंबई, ठाणेसह डझनभर महापालिका निवडणुकीत ‘अगोदर संघर्ष, मग सत्ता’ हा कल्याण-डोंबिवली पॅटर्न अमलात आणण्याचे दोन्ही पक्षांनी ठरवले आहे. मात्र ज्या कल्याण-डोंबिवलीत या पॅटर्नचा उदय झाला तेथे सत्ताधारी असलेले हे दोन्ही पक्ष गुण्यागोविंदाने नांदत नाहीत. परस्परांच्या उरावर बसण्याची एकही संधी सोडत नाहीत. परिणामी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि राज्य शासनाच्या हस्तक्षेपामुळे या शहरांच्या विकासाचा खेळखंडोबा झाला असून लोकशाहीचा गळा घोटला गेला. मुंबई-ठाण्यात युती तुटल्यावर त्याचे पडसाद केडीएमसीत उमटण्याची काहीच गरज नव्हती व नाही. महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक युतीमध्ये विस्तव जात नसल्याने पुढे ढकलली गेली. काही अपरिहार्य कारणास्तव निवडणूक पुढे ढकलली आहे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. महापालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. परिवहन समितीचीही मुदत संपली असून नव्या सदस्यांसाठी ६८ जणांनी फॉर्म नेले, मात्र कोणीही अर्ज भरलेला नाही. सत्ताधारी पक्षांंमधील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी ठामपासह मुंबईच्या निवडणुका झाल्यावर बघू, असा पवित्रा घेतला आहे. अलीकडेच संपन्न झालेल्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात शिवसेना-भाजपामधील मतभेद किती तीव्र आहेत, याचे प्रत्यंतर आले. साहित्यिकांच्या व्यासपीठावर मुळात बिगर साहित्यिक, राजकीय ठराव करायचेच कशाला, हा प्रश्न आहे. तसेच राजकारण्यांनी जे ठराव मंजूर झाल्याने काहीही फरक पडत नाही, अशा वांझोट्या ठरावांवरून एकमेकांना भिडण्याची गरज नव्हती.साहित्य संमेलनाकडे मराठीचा कैवार असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठ फिरवली. संमेलन भाजपाने हायजॅक केले, अशी आवई उठवण्याची संधी शिवसेना नेत्यांच्या संमेलनाकडे दुर्लक्ष करण्यामुळे प्राप्त झाली हे विसरता येणार नाही. डोंबिवलीसह कल्याणकरांनी मनपा निवडणुकीत सेनेला भरभरुन मते दिली, याची जाण त्यांनी ठेवणे गरजेचे आहे.संमेलन समारोपाच्या व्यासपीठावर २७ गावांकरिता नगरपालिका स्थापन करण्याचा ठराव स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी मांडण्याची गरज नव्हती. त्यामुळे चिडून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रस्तावित ग्रोथ सेंटरला आक्षेप घेणे अयोग्य होतो. शहरातील युवकांना रोजगार मिळणार असेल तर भाजपा-शिवसेनेच्या संकुचित राजकारणात ग्रोथ सेंटरचा बळी का जावा? राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘नेहले पे देहला’ आणि ‘देहले पे इक्का’ मारत लोढांच्या समर्थनाकरिता धाव घेण्याची गरज नव्हती. उभ्या महाराष्ट्रात डोंबिवली या सांस्कृतिक नगरीचे वाभाडे निघाले. कल्याण-डोंबिवलीचा शहरी भाग असो की त्याचा खेटून असलेला ग्रामीण भाग असो तेथील विकास करणे हे सत्ताधारी या नात्याने दोन्ही पक्षांचे उद्दीष्ट हवे. महापालिकेत गावे समाविष्ट करून विकास होणार की नगरपालिकेत हा मुद्दा गैरलागू आहे. लोकांना मनपात राहूनही विकास दिसला तर २७ गावातील नागरिक बेगडी नेत्यांच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडणार नाहीत. कल्याण-डोंबिवलीत असंख्य समस्या असून लाथाळ््यांमध्ये त्या सुटल्या नाहीत तर कल्याण-डोंबिवली पॅटर्न हा विकासाचा नव्हे तर लाथाळ््यांचा म्हणून ओळखला जाईल. -अनिकेत घमंडी-डोंबिवली