शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आईच्या पोटातच बाळाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 15:23 IST

टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते.

कल्याण - टिटवाळा येथे राहणा-या वर्षा रवी ढगे या गरोदर महिलेला प्रसूतीच्या वेदना काल पहाटे सुरु झाल्या. तिला उपचारासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आणले होते. तिच्यावर तातडीने उपचार करण्याऐवजी डॉक्टर नसल्याचे कारण देत तिला ताटकळ ठेवले. तब्बल पाच तासानंतर तिची  प्रसूती झाली. मात्र तिच्या पोटातील बाळ दगावले होते. दिवाळी आधीच तिच्या पोटी जन्माला येणारा तिच्या वंशाचा दिवा विझण्याचा प्रसंग ढगे कुटुंबियांवर ओढविल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

पोटातील बाळ दगावल्याने वर्षा याना जबर मानसिक धक्का बसला आहे.  महापालिका रुग्णालयातून नागरीकांना योग्य व वेळीच उपचार मिळत नसल्याची बाब या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाली आहे. या जीवघेण्या हलगर्जीप्रकरणी रुग्णालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ढगे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र पोलिस त्यांची तक्रार घेत नसल्याचे रवी ढगे यांनी सांगितले.रुक्मीणीबाई रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर रुची उपाध्याय यांच्याकडे वर्षा ढगे या उपचार घेत होत्या. चार महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना काल शुक्रवारी पहाटे चार वाजता प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. त्यांना उपचारासाठी त्यांचे पती रवी यांनी 5.45 वाजता दाखल केले. दरम्यान वर्षा यांच्या पायात पाणी झाल्याने त्यांच्या प्रसूतीसाठी रुग्णालयातील उपस्थित स्टाफने नकार दिला. 

त्याना पुढील उपचारासाठी मुंबईच्या शीव रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वर्षा यांना रक्तस्त्रव सुरु झाला होता. तरी देखील स्टाफ त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. त्यांच्या पतीला, सासूला,सास-यांना दाद देत नव्हता. पहाटे पाच वाजल्यापासून साडेबारा वाजेपर्यंत त्यांच्यावर उपचार झाले नाही. बाळाचे डोके वर्षा यांच्या मांडीला लागत असल्याचे सांगून देखील उपस्थित स्टाफने तुम्हाला जास्त कळते की आम्हाला असे सांगून वर्षा यांना गप्प केले. 

1 वाजून 8 मिनीटांनी बाळाचा जन्म झाला. ते बाळ मृत जन्माला आल्याचे सांगण्यात आले. बाळाचा मृत्यू 12 वाजून 30 मिनिटांनी झाल्याचे सांगितले. मात्र त्याची नोंद 1 वाजून आठ मिनिटे अशी केली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने बाळाचा जीव घेतला आहे. रवी ढगे यांना या आधी दोन मुली आहे. त्यांना मुलगा झाला होता. दिवाळीच्या आधीच त्यांच्या वंशाचा दिवा रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे विझला आहे. इतके सगळे घडून देखील आज  वर्षा यांना रुग्णालयात डिस्चार्ज देण्यास डॉक्टरांकडून नकार दिला जात होता. 

या प्रकरणी रवी ढगे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान यासंदर्भात रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी सांगितले की, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. ढगे यांच्या वेळी एक डॉक्टर होते. मात्र अन्य ओपीडीत व्यस्त होते. घडल्या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांच्या विरोधात कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. हा प्रकार कळताच मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई व जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयाच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.