शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan: जितेंद्र आव्हाड यांच्या त्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप आक्रमक

By मुरलीधर भवार | Updated: January 4, 2024 15:17 IST

Kalynan News: जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

- मुरलीधर भवार कल्याण - जितेंद्र आव्हाड हे काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासाठी हिंदू देवदेवता बद्दल काही बोलतात. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा पुरावा त्यांनी द्यावा असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे. मुघल आणि अफजल खान जितेंद्र आव्हाड यांचे दैवते आहेत.त्यांनी मुघल आणि अफझल खानाचा अभ्यास न करता श्रीराम आणि देवांचे पोथी पुराण वाचावे असा सल्ला दिला आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यावर राज्यभरात त्यांच्याविरोधात टिका केली जात आहे. कल्याणमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी देखील  आव्हाड यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार भोईर यांनी सांगितले की, जितेंद्र काहीही बरळतात. एका विशिष्ट वर्गाची मते घेण्यासठी हिंदू देवदेवतांविषयी बोलता. श्रीराम हे मांसाहारी होते. याचा त्यांनी पुरावा देऊन त्यांनी सिद्ध करावे. आव्हाड यांनी वयाचे तारतम्य बाळगावे. उगाचच एका वर्गाच्या भावना भडकविण्याचे काम करु नये. इतकेच नाही तर भाजप आमदार गायकवाड यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिका केली आहे. महाराष्ट्र ही साधू संताची भूमी आहे. त्या भूमीमध्ये श्रीरामांचा किंवा देवी देवींताचा इतिहास आणि भक्तीविषयी काही माहिती नाही. आव्हाड यांना फक्त मुघल आणि अफजल खानाबद्दल माहिती आहे. अफजल खान हे आव्हाडांचे दैवत आहे. श्रीरामाविषयी माहिती नसेल. त्यांनी तो अभ्यास करावा. आपण महाराष्ट्रात आणि भारत देशात राहत आहात. थोकडा त्याचाही अभ्यास करावा. फक्त मुघलांचा आणि अफजलखानाचा अभ्यास करु नये. देवांची पोथी पुराणे ग्रंथ वाचावेत असा सल्ला गायकवाड यांनी आव्हाड यांना दिला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडRam Mandirराम मंदिर