शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 10:06 IST

कारगिल डोंगरावरील विहिरीत बुडून १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

ठाणे : कळवा, पारसिक हिल येथील कारगिल डोंगरावरील विहिरीत पोहताना नवी मुंबई दिघा येथील सुमित मनोज माळी या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. 

शुक्रवारी सुमारे ७०० ते ८०० मीटर उंची असलेल्या डोंगरावर असलेल्या विहिरीमध्ये तो सहा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह अंदाजे ३० ते ३५ फूट खोल असलेल्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला.  विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याचा अंदाज न असल्याने तो बुडाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे, अशी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान मित्रांसोबत पोहायला म्हणून गेलेल्या मुलाचा दुसऱ्या दिवशी मृतदेहच घरी आल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.           

कळवा पूर्व येथील कारगिल डोंगरावरील विहिरीत एकजण बुडल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दूरध्वनीवरून मिळाली. त्यानंतर कळवा पोलीस कर्मचारी, सहायक आयुक्त (कळवा प्रभाग समिती), प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षातील स्विमर्स, तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान १-रेस्क्यू वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण, हा प्रकार सुमारे ७०० ते ८०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगरावरील विहिरीत घडला होता. त्यातच जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे व रात्रीच्या अपुऱ्या प्रकाशामुळे त्या ठिकाणी पोहचणे अशक्य होते. तसेच कळवा पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांच्या परवानगीने शोधकार्य थांबविले होते. शनिवारी सकाळी ७:३० पासून शोधकार्य सुरू केले. तीन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी १०:३० च्या सुमारास  युवकाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

खोलीचा व पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटनासुमित माळी सहा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. विहीर ही अंदाजे ३० ते ३५ फूट खोल असून विहिरीच्या खोलीचा व पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सुमित विहिरीमध्ये बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान मृतदेह डोंगरावरून खाली आणण्यासाठी ही सुमारे ५० मिनिटांचा कालावधी लागला. त्यानंतर मृतदेह कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे