शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कळवा रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल लांबला

By अजित मांडके | Updated: August 25, 2023 16:54 IST

साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबला आहे.

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यु तांडवानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार त्याचा अहवाल २५ ऑगस्ट रोजी येणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही चौकशी समितीचे काम पूर्ण न झाल्याने त्यांनी आता मुदतवाढ मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. अद्यापही काही डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी, प्रशासकीय कामकाज विभागातील कर्मचाºयांची चौकशी पूर्ण झाली नाही. त्यासाठी साधारपणे १० ते १२ दिवसांचा कालावधी जाऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल लांबला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी पाच जणांचा तर, रविवार १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी अवघ्या १२ तासात १८ रुग्ण दगावले होते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ९ जणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मागील आठवड्यात या समितीमधील प्रमुखांनी गुरुवार १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात या समितीची बैठक घेतली. यावेळी समितीने पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करीत, महत्वाची कागद पत्रे ताब्यात घेण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील कळवा रुग्णालयात जावून तेथील परस्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे २५ ऑगस्ट पर्यंत समिती अहवाल सादर करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अजूनही डॉक्टर्स, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासकीय कामकाज (अडमीन) विभागातील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी पूर्ण झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या सर्वांच्या चौकशीसाठी आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या चौकशीनंतर अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  त्यामुळे चौकशी अहवालासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणे