शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयाचा चौकशी समितीचा अहवाल लांबला, २५ ऑगस्टपर्यंत येणं होतं अपेक्षित

By अजित मांडके | Updated: September 12, 2023 15:49 IST

चौकशी अधिकारी आयुष्यमान भव कार्यक्रमात व्यस्त

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कळवा हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट महिन्यात झालेल्या मृत्युच्या तांडवा संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल २५ ऑगस्ट पर्यंत येणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे महिना उलटूनही कोणावरही कारवाई झालेली नाही. परंतु चौकशी समितीने अहवाल तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु केंद्राच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमात सर्वच व्यस्त असल्याने अहवाल लांबला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पुढील दोन दिवसात आणखी सहा रुग्णांचा मृत्यु झाला होता. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मंडळींनी याठिकाणी हजेरी लावून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. काहींनी तर या प्रकरणाची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार या समितीच्या माध्यमातून तत्काळ चौकशीही सुरु झाली होती. या चौकशीत येथील मुख्य अधिष्ठता यांच्यासह रुग्णांवर उपचार करणाºया सर्वच डॉक्टरांची कसुन चौकशी करण्यात आली होती. तसेच महत्वाचे कागदपत्रे देखील हाती घेतली गेली होती.त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार २५ आॅगस्ट पर्यंत याचा अहवाल समोर येणे अपेक्षित होते. त्यानुसार कारवाई देखील केली जाणार होती. परंतु २५ आॅगस्ट नंतर पुन्हा १० दिवसांचा अवधी जाईल असे सांगण्यात आले होते. आता ते १० दिवसही उलटून गेले आहेत. परंतु अद्यापही चौकशी समितीचा अहवाल काही पुढे आलेला नाही. परंतु चौकशी समितीचा अहवाल अंतिम झाला असल्याची सुत्रांनी दिली. परंतु सध्या राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा केंद्राच्या आयुष्यमान भव या कार्यक्रमासाठी तयारी करीत आहेत. त्यात चौकशी समितीमधील अधिकारी देखील व्यस्त झाले असल्याने अहवाल येण्यास विलंब होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. परंतु अहवाल लांबला गेल्याने, या घटनेचे गांर्भीयही निघून जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :kalwaकळवा