शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

कळवा रुग्णालय आणि गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचा प्रकरण अडकणार आचांसहितेच्या कात्रित

By अजित मांडके | Updated: February 20, 2024 15:50 IST

मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या कामांचा नारळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु असे असले तरी यातील राम गणेश गडकरी रंगायतन आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार असल्याची माहिती समोर आली आहे. निविदा प्रक्रिया देखील या कामांच्या अद्याप राबविण्यात आलेल्या नाहीत. तर या कामांसाठी आवश्यक असलेला निधी देखील राज्य शासनाकूडन महापालिकेला प्राप्त झालेला आहे. तरी देखील या कामांचा मुहुर्त हुकणार असल्याचेच चित्र दिसत आहे.

मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे अंतर्गत ठाणे शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात रस्त्यांची कामे देखील आता अंतिम टप्यात आली आहेत. सौंदर्यीकरणाअंतर्गत सुशोभीकरण केले गेले आहे. शौचालयांच्या दुरुस्तीचे कामही अंतिम टप्यात आले आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरासाठी वाढीव पाण्याचे नियोजन करण्यासाठी रिमॉडेलींगची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार यासाठी तब्बल ३२३ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. यातील संप, पंप यांची २५ कोटींची कामे वगळता इतर कामांच्या निविदा अंतिम झाल्या असून त्याच्या वर्क आॅडर्र देखील येत्या काही दिवसात दिल्या जाणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.

परंतु दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाकडून ६० कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तो निधी देखील पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या निधीतून रुग्णालयात अतिरिक्त ५०० खाटा वाढविल्या जाणार आहेत. तसेच रंगरंगोटी, नवीन एसी बसविणे आदींसह इतर महत्वाची कामे केली जाणार आहेत. परंतु अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम झालीच नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे देण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तो निधी देखील पालिकेला प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रंगायतनची दुरुस्ती करतांना कलाकारांची मते देखील विचारात घेतली जात आहेत. १९७८मध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता १८ वर्षांनी नुतनीकरण होत आहे. रंगायतनची आसनक्षमता १०८० एवढी आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने, मुख्य वास्तूचे मजबुतीकरण, तालीम हॉलचे नुतनीकरण, मुख्य प्रेक्षागृहातील संपूर्ण आसनव्यवस्था बदलणे, रंगकर्मी यांच्यासाठी असलेल्या ग्रीन रूममध्ये आवश्यक सुधारणा, रंगमंच-फ्लोरिंग अद्ययावत करणे, वातानुकूलन यंत्रणेत सुधारणा,  शौचालयांचे संपूर्ण अद्यावतीकरण आदी कामांचा समावेश आहे. परंतु या प्रकल्पाची देखील निविदा प्रक्रिया अद्यापही अंतिम झालेली दिसून आलेली नाही.

गडकरी रंगायतनचा खर्च वाढणार

राज्य शासनाकडून जरी रंगायतनच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींचा खर्च मंजुर झाला असला तरी देखील या कामाचा खर्च आणखी दोन ते तीन कोटींनी वाढू शकतो असा अंदाज महापालिकेच्या संबधींत विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार त्याचे नियोजन केले जात आहे. तसेच ठाणेकरांना एक प्रकारे अभिमान वाटावा अशा पध्दतीने दुरुस्तीचे हे काम केले जाणार आहे. त्यामुळेच निविदा प्रक्रियेला वेळ जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु मार्च च्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या आधी या कामांच्या निविदा अंतिम होऊन वर्क आॅर्डर दिली गेली नाही, तर मात्र या दोन्ही दुरुस्तींच्या कामे आणखी तीन महिने उशीरा सुरु होतील असा अंदाज वर्तविली जात आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे