शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याच्या हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप, सत्र न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:46 IST

जमिनीच्या वादातून पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करणाºया काकाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करणे आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करणे

कल्याण : जमिनीच्या वादातून पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करणाºया काकाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करणे आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करणे, अशा दोन गुन्ह्यांत शिक्षा झाली आहे. मात्र, पुराव्याअभावी काकीची निर्दाेष सुटका झाली आहे, अशी माहिती सरकारी वकील अ‍ॅड. रचना भोईर यांनी दिली.विश्वास कचरू म्हसकर असे हत्या झालेल्या पुतण्याचे नाव आहे. तर, शिक्षा झालेल्या काकाचे नाव बाळाराम गोविंद म्हसकर असे आहे. बदलापूर परिसरातील वाळवली गावात जमिनीच्या वादातून बाळाराम आणि विश्वास यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. यात बाळाराम याने लाकडी दांडक्याने मारहाण करून विश्वासच्या डोक्यात स्वत:कडील परवानाधारक पिस्तुलामधून गोळी झाडली होती. यात विश्वासचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ६ मार्च २०११ ला घडली होती. याप्रकरणी विश्वासचा भाचा गिरीश काळू जोशी याने दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून काका बाळारामसह त्याची पत्नी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली, तर बाळाराम आणि त्याची पत्नी सुरेखा या दोघांविरोधात हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्यात आला.सत्र न्यायालयात झालेल्या खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. भोईर यांनी पाहिले. तर, पोलीस हवालदार संतोष करंजकर यांचे या वेळी विशेष सहकार्य लाभले.कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश न्या. एस.पी. गोगरकर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान १४ साक्षीदार तपासण्यात आले. नुकताच या खटल्याचा निकाल देण्यात आला. लाकडी दांडक्यांनी मारहाण करून दुखापत करणे, या गुन्ह्याप्रकरणी दोन वर्षे सजा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास एक महिना जादा कैद, तर हत्येच्या गुन्ह्यात बाळारामला जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या पत्नीची मात्र निर्दाेष मुक्तता झाली.